खाेदकामाच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

‘वाटाघाटी’ तहकूब 
विविध विकासकामांसाठी खासगी वाटाघाटीने भूसंपादन करताना जमीनमालकास ३० टक्के दिलासा रक्कम देण्याचा विषय मान्यतेसाठी होता. सदर विषय तीन महिन्यांसाठी तहकूब ठेवण्याचा आदेश महापौर उषा ढोरे यांनी दिला.

पिंपरी - आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावर पसरला आहे. त्यावरून दुचाकी घसरून पडल्याने महिला जखमी झाली. त्याच वेळी भरधाव मोटार त्यांच्या डोक्‍यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  याप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत जाहीर केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिखलीतील सरस्वती शिंदे (वय ५६) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आयुक्त हर्डीकर यांनी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांची चौकशी समिती नियुक्त केली. तीन दिवसांत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र सहायक आयुक्तपदी संभाजी ऐवले यांची नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. सध्या ते नागरवस्ती विभागात समाजविकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. 

Video : अरेरे...ही स्वच्छता म्हणायची, की नुसता ‘धुरळा’

दरम्यान, राज्य सरकारच्या सूचनेनुसार दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे बंधनकारक आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची नियुक्ती करण्याचा ठराव विधी समितीने सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता.

सध्या पालिकेच्या धोरणानुसार, दिव्यांगांशी विवाह करणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे. छोटा उद्योग उभारण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज आणि व्हीलचेअर, काठी आदी साहित्य खरेदीसाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. 

Video : सिलेंडरच्या स्फोटामुळे पिंपरीतील कंपनीला भीषण आग!

शहरात चार हजार दिव्यांग आहेत. त्यांना प्रतिमहिना दोन हजार रुपये वेतन दिले जाते. त्याचे लाभार्थी एक हजार ६१६ आहेत. 

पिंपरी-भोसरी रस्त्यालगत नेहरूनगरमध्ये पीएमपीचे आगार उभारण्यासाठी २४ गुंठे क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित आहे. तो महापालिकेच्या ताब्यात आला आहे. त्यावर आगार बांधण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतच्या विषयास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. 

दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी १४० कोटी रुपयांचा निधी राखीव आहे. त्यातून १० कोटी रुपये आगार बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. या आगाराची क्षमता सुमारे ३० बस उभ्या राहू शकतील इतकी असेल. निगडी ओटास्कीम येथील मधुकर पवळे शाळेची इमारत ३० वर्षे जुनी आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिटनुसार इमारत धोकादायक झाली आहे. येथील विद्यार्थी बाजूच्या नवीन इमारतीत स्थलांतरित करणार आहेत. मात्र, पवळे शाळेची इमारत रेड झोनमध्ये असल्याने नवीन बांधकाम करणे अशक्‍य आहे. त्यामुळे सदर इमारतीची केवळ दुरुस्ती केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to appoint a two member inquiry committee to investigate the digging work