esakal | बारामतीकरांचा स्तुत्य निर्णय, यंदा हा उत्सव करणार घरातच साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत होणारा भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करता घरातच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बारामतीकरांचा स्तुत्य निर्णय, यंदा हा उत्सव करणार घरातच साजरा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत होणारा भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करता घरातच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता कमी होणार

बारामती शहरामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी भगवान वीर गोगादेव निशान अखाड़ा स्थापन करण्यात आला आहे. शहरता गेल्या 18 वर्षांपासून भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा केला जातो. बारामतीत नाथपंथी गोरक्षनाथ व भगवान वीर गोगादेव यांचे मंदिर आहे. गोगादेव जन्मोत्सव साजरा करताना नागपंचमीस पवित्र निशाणाची (काठीची) स्थापना केली जाते. या दरम्यान मंदिरामध्ये पवित्र निशाणाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. गोकुळाष्टमीला गोगाजी नवमीला समारोपाची मिरवणूक निघते. त्यावेळी राज्यातून भाविक येतात. 

आता शुभमंगल सावधान म्हणा वीस लोकांमध्येच

कोरोनामुळे मंदिर बंद राहणार असून, दर्शनासाठीही कोणी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. निशाण आखाड्याचे प्रमुख भगत व इतर दोघेजणच पूजा करणार असून, इतर कोणीही मंदिरात येऊ नये, असे ठरले आहे, अशी माहिती निशाण आखाड्याचे अध्यक्ष अॅड. धीरज लालबिगे यांनी दिली. या संदर्भात पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनाही यंदाचा जन्मोत्सव रद्द केल्याचे पत्र दिले गेले. या वेळी अॅड. धीरज लालबिगे, भगत प्रीतम लालबिगे, धर्मेंद्र कागड़ा, संजय मुलतानी, आरोग्य अधिकारी अजय लालबिगे, विलासराव लालबिगे, किरासपाल वाल्मिकी, मुकेश वाघेला, गोपाल वाल्मिकी, बलवंत झुंज, राजेश लोहाट, आनंद लालबिगे, योगेश लालबिगे, साजन लालबिगे, राज लालबिगे, महेंद्र तुसंबड, प्रदीप लालबिगे यांनी हा निर्णय घेतला आहे.