esakal | भीमथडी ते बारामती...वैभवशाली इतिहासाची सोनेरी पाने जिवंत होणार...
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

पूर्वीची भीमथडी व आजची बारामती असलेल्या वैभवशाली परंपरा असलेल्या या टुमदार नगरीचा इतिहास आता पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. बारामतीचे भूषण असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या वाड्याची आता पुनर्बांधणी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. 

भीमथडी ते बारामती...वैभवशाली इतिहासाची सोनेरी पाने जिवंत होणार...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : पूर्वीची भीमथडी व आजची बारामती असलेल्या वैभवशाली परंपरा असलेल्या या टुमदार नगरीचा इतिहास आता पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. बारामतीचे भूषण असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या वाड्याची आता पुनर्बांधणी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. 

बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हो मोठा धोका...  

पेशव्यांचे सावकार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांचा शहरातील कऱ्हा नदीकाठी वाडा होता. वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा संपूर्ण परिसर आहे. या लगतच श्री सिद्धेश्वराचे मंदीर आहे. या वाड्याचे सुशोभिकरण करण्यासह या वाड्याच्या तटबंदीचे पुर्नबांधकाम केले जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. बारामतीची सर्वांगिण माहिती बाहेरगावाहून येणाऱ्यांना या माध्यमातून देण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख व्हावी, असा या मागचा उद्देश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वास्तूविशारद पी. के. दास हे या वास्तूच्या पुर्नबांधणीचा आराखडा करीत आहेत.  वाड्याच्या प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना असायचा, त्याचीही नव्याने रचना केली जाणार आहे. नदीच्या बाजूला असलेल्या पूर्वीच्या अल्पबचत भवनचे पिलर काढून टाकले जाणार असून, तटबंदीची चारही बाजूंनी दुरुस्ती केली जाणार आहे. या वाड्याच्या आतील बाजूस असलेली टाउन प्लॅनिंग कार्यालयाची इमारत पाडली जाणार आहे. मागील बाजूनेही प्रवेश दिला जाणार असून, त्या ठिकाणी तिकीट काउंटर केले जाणार आहे. या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या हाताला असलेल्या जुन्या प्रांत कार्यालयाचे रुपांतर या वाड्याच्या प्रशासकीय इमारतीत होईल. सध्या ज्या ठिकाणी स्टँप व्हेंडर्स बसतात, तेथे बारामतीच्या संदर्भातील पुस्तके व इतर बाबींची विक्री करण्यासाठी शॉपी उभारली जाईल. 

जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 

एक्झिबिशन सेंटर होणार 
जुनी तहसील कचेरी इमारत जेथे आहे, तेथे एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार आहे. पूर्वीच्या भीमथडीपासून ते 2020 पर्यंत बारामतीने जी स्थित्यंतरे अनुभवली, त्याचे दर्शन पर्यटकांना घडविण्याचा मानस आहे. दोन मजली इमारत येथे उभारली जाणार असून, त्याला लागूनच एक सुंदर फाउंटन व कॅफेटेरिया उभारला जाईल. आतील बाजूस जी जुनी क्वार्टर आहेत, त्या ठिकाणी एक अँम्फी थिएटर तयार होणार आहे. या वाड्यातून दिसणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत लेझर शो करण्याबाबतही रचना केली जाणार आहे. 

तटबंदीवरून चालता येईल 
विशेष म्हणजे या वाड्याच्या तटबंदीवरून चालत जाता येणार असून, चारही बाजूंच्या तटबंदीला चालत फेरी मारता येईल. सध्याच्या पोलिस ठाण्याच्या इमारतीला तसेच ठेवून त्याला जुना लूक देत येथे एक सभागृह करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

Edited by : Nilesh Shende