
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड॒स उपलब्ध आहेत. जम्बो हॉस्पिटलची गरज भासल्यास त्याचा वापर ऑक्सिजनयुक्त बेड॒सची गरज असलेले रुग्ण आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे.
पुणे - सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड॒स उपलब्ध आहेत. जम्बो हॉस्पिटलची गरज भासल्यास त्याचा वापर ऑक्सिजनयुक्त बेड॒सची गरज असलेले रुग्ण आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी करण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. जम्बो हॉस्पिटलसह निर्बंधांबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठकीत होणार आहे. शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात सौरभ राव यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुकाणू समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. बैठकीत जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा-महाविद्यालये १५ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्याशिवाय, आणखी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी ‘आयसर’ आणि ‘टीसीएस’ या संस्क्षांकडून शास्त्रोक्त अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही निर्बंध लावण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारच्या आढावा बैठकीत होणार आहे.
जेईई मेन्स दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात
जम्बो हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड॒स -
पुणे महापालिका कार्यक्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु या रुग्णसंख्येसाठी ससूनसह खासगी रुग्णालयात पुरेसे बेड॒स आहेत. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील जम्बो हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड॒सऐवजी केवळ ऑक्सिजनयुक्त बेड॒सची सुविधा राहील. तसेच, कंत्राटदारास ते पुढील १५ दिवस भाडे न देता सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणखी एक खटला दाखल; ५ मार्चच्या निकालाकडे लक्ष
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जम्बो’ नाही
पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मर्यादित आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड॒स उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे सध्या जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात येणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Edited By - Prashant Patil