अरे वा...पुण्यातील या तालुक्यात कोरोनाचा विळखा होताय सैल  

saswad
saswad

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोराना संसर्ग अधिक असला, तरी उपलब्ध वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणा झटत असल्याने; केवळ शासकीय  कोविड केअर व हेल्थ सेंटरमधून तब्बल 383 रुग्णांना ठणठणीत करुन घरी सोडण्यात यश मिळाले आहे. तर, विविध खासगी रुग्णालयातही दाखल असलेले 164 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या एकुण 527 रुग्णांची संख्या पाहता हे प्रमाण लक्षणीय 79 टक्के आहे.

पुरंदर तालुक्यात आतापर्यंत 671 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. पैकी 26 रुग्ण दगावले. रुग्ण दगावण्याचे प्रमाण 3.87 टक्के आहे. म्हणजेच शिल्लक 645 रुग्णामधील 527 रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाबाधीत 118 रुग्ण उपचारार्थ कोविड सेंटर वा विविध रुग्णालयात आहेत. सासवड शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजअखेर सासवड शहरातील रुग्ण संख्या 298 आहे. त्यातून 10 बळी गेले आणि तब्बल 243 रुग्ण बरे झाले. सध्या शहरातील 46 रुग्ण विविध ठिकाणी उपचारार्थ दाखल आहेत. सासवड शहरातील संसर्ग मर्यादित करण्यात मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, पथकातील संजय पवार, राजेंद्र निरगुडे, अमित बहीरट आदी टिम करीत आहे.

तालुक्यात 59 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनौबत, उपलब्ध डाॅक्टर, विविध अधिकारी व यंत्रणा राबत आहे. खासगी रुग्णालयातही उपचार वाढलेत. पुरंदर तालुका मेडिकल असोसिएशनचे सरकारी आरोग्य यंत्रणेस सहकार्य मिळत आहे. या सामूहिक प्रयत्नात रुग्ण वाढीचे प्रमाण या आठवड्यात घटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय मनुष्यबळ वाढले तर.. 
पुणे जिल्ह्यातील इतर वजनदार तालुक्यांच्या तुलनेत कोविड केअर सेंटर व हाॅस्पीटलसाठी वैद्यकीय मनुष्यबळ पुरंदरमध्ये कमी आहे. मात्र, तरीही ऐतिहासिक पुरंदरमध्ये कोरोनाविरुध्द लढाई लढली जातेय. त्यास वरिष्ठ प्रशासनाने आणखी बळ दिले तर तालुका अजून कोरोनामुक्तीसाठी झटेल, हे स्पष्ट आहे. आमदार संजय जगताप यांचे त्यासाठी नित्यदिनी प्रयत्न सुरुच आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com