जेईई मेन परीक्षेच्या नोंदणी करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

jee.jpg
jee.jpg

पुणे : देशातील आयआयटीमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या नोंदणीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सप्टेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी झालेल्या नोंदणीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ७.१२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

जानेवारीमध्ये घेतलेल्या जेईई मेन परीक्षेसाठी ९ लाख २१ हजार २६१ विद्यार्थ्यांनी बी.टेक्. साठी नोंदणी केली होती, तर सप्टेंबर सत्रासाठी एकूण ७, ४६, ११५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. यात बी. टेक/बीईसाठी ६०५, बी. आर्किटेक्ट आणि बी. प्लानिंग साठी ४८९ परीक्षा केंद्रे देशभरातील  २२४ शहरांमध्ये तर परदेशातील ८ शहरांमध्ये परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे अनेक विद्यार्थी शहरातून आपल्या गावी गेले आहेत. तर गावांमधील विद्यार्थ्यांनी जवळच्या शहरातील परीक्षा केंद्र निवडली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षेसाठी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रवास करावा लागणार आहे.

जेईई मेन २०२० (सप्टेंबर) नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
- बीई / बीटेक : ७,४६,११५
- बी. आर्किटेक्चर : १३,६०९
- बी. प्लानिंग : ६९९
- बीटेक आणि बी. आर्किटेक्चर : ५३,५२०
- बीटेक आणि बी. प्लानिंग : ५,५८०
- बी. आर्किटेक्चर आणि बी. प्लानिंग : २,७७७
- बीटेक, बी. आर्किटेक्चर आणि बी. प्लानिंग : ३५,९७३
- एकूण : ८,५८,२७३


परीक्षेला जाताना ही घ्या काळजी :

  •  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर तपासणी आणि सॅनिटायझेशनमध्ये अधिक वेळ लागू शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याआधी किमान एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे.
  • परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ठराविक असा 'टाइम स्लॉट' दिला जाऊ शकतो. त्याचे विद्यार्थ्यांनी पालन करत नेमून दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी  ओळखपत्राबरोबरच 'जेईई मेन २०२०'चे प्रवेश पत्र दाखवावे लागणार आहे.
  • परीक्षा केंद्रात अन्य कोणतेही सामान न्यायला परवानगी नाही.
  • केंद्रावर प्रवेश केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com