Corona Virus : लॉकडॉऊनमुळे कोरोनाचा प्रसार कमी होतोय पण....

Decrease spread of Corona Virus but testing needs to be increased.jpg
Decrease spread of Corona Virus but testing needs to be increased.jpg
Updated on

पुणे : देशात लाॅकडाऊन केल्याने कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार मंदावला आहे. पण याच काळात टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तरच लाॅकडाऊनचा उपयोगी होईल, असा निष्कर्ष "इंडिया-सिम" गणितीय प्रतिमातून काढण्यात आला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
देशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील आघाडीच्या संशोधकांचा समावेश असलेल्या "इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड" या राष्ट्रीय गटाने कोरोना विरोधात लढण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात मध्ये एक भाग म्हणून 'कोरोना प्रसाराचे गणिती प्रतिमान' तयार करणे हे आहे. यामध्ये 
प्रतिमानाचे काम करणाऱ्या उपगटाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे (सीएमएस) डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर दोघे करत आहेत. चेन्नई येथील गणितीय विज्ञान संस्था आणि बेंगालूरू येथील भारतीय विज्ञान संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा देखिल या गटात समावेश आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...
डॉ. स्नेहल शेकटकर म्हणाले, "उपगटाकडे उपलब्ध असेलेल्या आकडेवारी वरून कोरोनाचा गणितीय प्रतिमान विकसीत करण्यासाठी अभ्यास सुरू केला. यातून "इंडिया-सिम" हे भारतातील रोगप्रसाराचा अभ्यास करण्यासाठीचे गणितीय प्रतिमान विकसित करण्यात आले. हे आत्तापर्यंतचे हे सर्वांत व्यापक प्रतिमान आहे. या अभ्यासातून सरकारने दोन टप्प्यात केलेल्या लॉकडाऊनमुळे विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर कमी आहे. त्यामुळे भारतात मृत्यूचा अाकडा कमी आहे, ही सकारात्मक गोष्ट घडली आहे. पुढील काळात कोरोनाला रोखण्यासाठी केवळ लाॅकडाऊन करून जमणार नाही तर यासाठी संसर्ग झालेल्यांना शोधण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवावे लागेल. तसेच जे रुग्ण सापडतील त्यांचे विलगीकरण करावे लागेल. टेस्टिंग न केल्यास संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढेल. 

- शहरे, जिल्हे आणि राज्य अशा विविध पातळ्यांवर आरोग्यसेवांशी संबंधित संसाधनांचे आणि विविध उपाययोजनांचे नियोजन करता येणार. 
- प्रतिमानाचा उपयोग करून लॉकडाऊन, संशयित बाधीतांचे विलगीकरण, रोगाच्या चाचण्यांची संख्या इत्यादी गोष्टींचा कसा परिणाम होऊ शकेल याची तुलना करणे शक्य. 
- प्रतिमानामुळे पुढे आपल्याला किती खाटांची आणि अतिदक्षता विभागांची गरज पडेल याचा अंदाज बांधता येणे शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com