अपघातग्रस्त दीपालीला उपचारानंतर सोडले घरी

युनूस तांबोळी
गुरुवार, 24 मे 2018

पोलिस भरतीसाठी गेल्यानंतर मुंबईत झाला होता अपघात

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): "अशा ठिकाणी माझा अपघात झाला, जिथे अपघातानंतर जिवंत सापडणे मुश्‍कील; पण माझ्यावर प्रेम करणारे व शिक्षणासाठी प्रोत्साहित करून मदत करणाऱ्यांमुळेच मी वाचले. त्यांच्या शुभेच्छा वाया जाऊ देणार नाही. मी यापुढेही खूप शिकणार आहे. माझ्या आईच्या कष्टाला बळ देणारं आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.'' अश्रू भरल्या डोळ्यांनी दीपाली काळे सांगत होती. मुंबईतील रुग्णालयातून बाहेर पडताना तिची ही प्रतिक्रिया होती.

मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रियेदरम्यान शिरूर येथील शितोळे ऍकॅडमीतील चार तरुणींना चारचाकी वाहनाने उडविले. यामध्ये काजल कर्डे, दीपाली काळे, चित्राली पानगे आणि चैत्राली दोरगे या तरुणी जखमी झाल्या होत्या. त्यामध्ये दीपालीला जास्त दुखापत असल्याने सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. चिंचोली मोराची (ता. शिरूर) मधील काळे पारधी समाजातील गरीब कुटुंबातील आहे. अशोक उर्किडे यांना घटनेची माहिती मिळताच काळे कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या निवास व जेवणाचा खर्च उचलला होता.

"सकाळ'ची मदत
दीपालीला डोक्‍याला मार लागल्याने तिचे सिटीस्कॅन व हातावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते; परंतु ती शस्त्रक्रिया करण्यासाठी शारीरिक फिटनेस नसल्याचे प्रथम वैद्यकीय अधिकारी सांगत होते. त्यामुळे तिच्या हातावर शस्त्रक्रिया झाली नाही. यादरम्यान "सकाळ'च्या प्रतिनिधीने रुग्णालयात दीपालीची भेट घेऊन तिला मदतीचे आवाहन केले. त्यानंतर रुग्णालयात हालचाली होऊन तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Web Title: deepali kale discharge from hospital