Dehu Road to Satara Highway : देहूरोड ते सातारा महामार्ग २०१० मध्ये सहा पदरी करण्याची घोषणा झाली; पण...

पश्चिम बाह्यवळण महामार्ग १९९०च्या दशकात फक्त १२ मीटरचा होता.
Dehu Road to Satara Highway
Dehu Road to Satara HighwaySakal

खडकवासला - पश्चिम बाह्यवळण महामार्गाच्या वडगाव- वारजे दरम्यान सिंहगड रस्त्याच्यावर आणि मुठानदीच्या पुलावर सुमारे दीड किलोमीटर सेवा(सर्व्हिस) रस्ता नाही. तसेच महामार्ग सहा पदरी नाही, पाच पदरीच आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे आज शनिवारी १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन होत आहे. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या संदर्भात काही घोषणा करणार का, याबाबत स्थानिक नागरिकाचे लक्ष लागले आहे.

Dehu Road to Satara Highway
Pune : कुकडेश्वर मंदिराला ताडपत्रीचे संरक्षण; शिल्पकला पाहण्यात अडचणी

देहूरोड ते सातारा महामार्ग २०१० मध्ये सहा पदरी करण्याची घोषणा झाली. शहरी भागात सेवा रस्त्यांची घोषणा झाली. पण वडगाव- वारजे दरम्यान रस्ता सहापदरी नाही, फक्त पाच पदरीच आहे. आणि त्याला सेवा रस्ताही नाही. यामुळे दररोज गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना जाणाऱ्या- येणाऱ्या हजारो वाहनचालकांना करावा लागत आहे.

पश्चिम बाह्यवळण महामार्ग १९९०च्या दशकात फक्त १२ मीटरचा होता. जाण्या येण्यासाठी प्रत्येकी एक- एक रस्ता होता. महामार्गाचे रुंदीकरण २००० च्या दशकात करताना नदीवर, सिंहगड रस्त्यावर तीन पदरी म्हणजे १८ मीटरचा पूल झाला.

Dehu Road to Satara Highway
Mumbai : मासळीविक्रीचे नवे केंद्र करंजा; ससून डॉकला पर्याय, खवय्यांसाठी पर्वणी

जूना १२ मीटरचा महामार्ग वडगावहून वारजेकडे जाण्यासाठी राहिला. त्यावर, तेंव्हापासून तीन ऐवजी ‌दोन पदरी रस्ता आहे. एक पदरी रस्ता नाहीच. नवीन १८ मीटरचा रस्ता वारजेहून वडगावकडे येण्यासाठी वापरात आहे.

सहा पदरी रस्ता करताना सेवा(सर्व्हिस) रस्त्याला प्राधान्य दिले आहे. येथे मात्र सेवा(सर्व्हिस) रस्ता झालाच‌ नाही.परिणामी, येथे 'बॉटल नेक' झाला आहे. यामुळे,दोन्ही जुन्या पुलावर कोंडी होते. मागील महिन्यात नदीच्यापुलावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, याबाबत 'सकाळ' ने सातत्याने या परिसरातील वाहतूक कोंडीचे बातम्या प्रसिद्ध करून पाठपुरावा केला आहे.

Dehu Road to Satara Highway
Pune Chandani Chowk: "असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं"; मेधा कुलकर्णींच्या भावनांचा उद्रेक

वारजे ते वडगाव दरम्यान दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटरचा सेवा रस्ता सुचविला आहे. मुठा नदी, कालवा, बंद जलवाहिनी कालवा,सिंहगड रस्त्यावर पूल रस्ता करण्यात येणार आहे.

त्यासाठी अंदाजित खर्च ३६ कोटी रुपये अपेक्षित आहे. तसेच त्याच्या शेजारी पालिकेला देखील डीपी रस्ता करावा. असे सुचविणार आहे. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.

Dehu Road to Satara Highway
Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे

नदीच्या पुलावर वारजे ला येताना आणि वडगावला जाताना सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक संथ होते. किरकोळ अपघात, वाहन बंद पडले की, वाहतूक कोंडीत भर पडते. वाहनांच्या रांगा लागतात. या ठिकाणी उपाययोजना करण्याचा पत्रव्यवहार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केला आहे.

-विशाल पवार, सहायक पोलीस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग

दररोज मोटारीने या वारजे वडगाव दरम्यान प्रवास करतो. सकाळी नऊ ते साडे दहाच्या संध्याकाळी सहा ते १० दरम्यान नदीच्या पुलावर सकाळी गर्दी असते.

वारजे ते वडगावला येण्यासाठी महामार्गावर १०- १५ मिनिटे वेळ लागतो. वडगावहून वारजे ला जायचे असेल तर नदीच्या पुलावरील वाहतूक कोंडीची माहिती घेऊनच त्या रस्त्याने प्रवास करायचा का हे ठरवतो.

- विठ्ठल वांजळे, वारजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com