Delivery Boy
sakal
पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचे पडसाद आता फूड डिलिव्हरी क्षेत्रावर उमटू लागले आहेत. गॅसअभावी अनेक लहान-मोठी हॉटेल्स तसेच क्लाऊड किचन तात्पुरती बंद ठेवावी लागली आहेत. परिणामी, ऑनलाइन फूड ऑर्डरमध्ये लक्षणीय घट झाली असून स्विगी आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवरील व्यवहार मंदावले आहेत.