
आळंदी (पुणे) : इंद्रायणी नदीपात्रात गणेश मूर्ती विसर्जनास बंदी केलेली आहे. मात्र, आळंदी पालिका प्रशासनाने याबाबत पर्यायी व्यवस्था केलेली नाही. तसेच, मूर्तीदानासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आळंदीकरांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
आणि मुर्तादानातील मूर्ती हस्तांतरित करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराबाबतचा निर्णय एककल्ली असून, आळंदीकरांना विश्वासात घेतले नाही. आळंदीकरांनी गेली पाच वर्षे मूर्तीदानास प्रतिसाद दिला, मात्र गणेशभक्तांनी मूर्ती दान केल्यावर त्यांची काळजी ठेकेदारांकडून घेतली जात नाही. त्यामुळे कोणत्याही ठेकेदारास मुर्त्या हस्तांतरित करू नये. प्रशासनाकडून पर्यायी सोय नसल्याने आळंदीकरांनी निवेदनाद्वारे पालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्ती केली. प्रशासन मात्र ठेकेदाराकडेच मुर्त्या जमा करण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे.
याबाबत आळंदी ग्रामस्थांची बुधवारी (ता. २६)हजेरी मारूती मंदिरात बैठक झाली. बैठकीनंतर मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मूर्ती दान करण्यास विरोध नाही, मात्र मूर्ती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था काय करणार, याबाबत पालिकेने नागरिकांना अद्याप कळवले नाही. मागील वर्षी दान केलेल्या मूर्ती नेण्यासाठी ठेकेदार नेमला. मात्र, त्याने चांगल्या मूर्ती घेऊन उर्वरित तुटलेल्या व भंगलेल्या मूर्ती नदीकाठीच ठेवल्या. तसेच, गेली तीन वर्षे भंगलेल्या मूर्ती पालिकेने शाळेत ठेवल्या. मूर्तींची विटंबना झाली. त्यातून गणेशभक्तांच्या भावनाही दुखावल्या. तरिही प्रशासनाने लाखो रूपयांचे बिल ठेकेदारास अदा केले. नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांनी केली. असा बेजबाबदार ठेकेदार पुन्हा नेमला, तर आळंदीकर पालिकेला मूर्तीदानात सहकार्य करणार नाही. पालिकेने इंद्रायणीकाठी बॅरिकेटिंग केले. मात्र, मूर्ती विसर्जनासाठी चांगली पर्यायी व्यवस्था जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत मूर्तीदानास विरोध राहिल.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या बैठकीस मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, शंकर कुऱ्हाडे, संदिप नाईकरे, दिनेश घुले, योगशे दिघे, नितीन साळुंके, अविनाश तापकीर यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आळंदीत सहा हजार मिळकती आहेत. याचबरोबर ऐंशी टक्क्यांहून अधिक मिळकतीत भाडेकरू आहेत. जवळपास दहा- बारा हजारहून अधिक गणेश विसर्जन होणार आहे. याचबरोबर लगतच्या केळगाव, चऱ्होली गावातील गणेश मूर्तीही इंद्रायणीत विसर्जित केल्या जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक घरात विसर्जन करू शकणार नाहीत. मात्र, तरिही पालिकेने विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था अद्याप केली नाही. आजपासून गणेश विसर्जनास सुरूवात होणार आहे. पालिका प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे.
नजर चुकवून विसर्जन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी पोलिस आणि आळंदी पालिका प्रशासनाने नदीपात्रात गणेश मूर्ती विसर्जनास बंदी केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने नदीकाठी पात्राकडे येणाऱ्या मार्गावर बांबूचे बॅरिकेट केले. मात्र, तरिही काही महाभाग प्रशासनाची नजर चुकवन नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जन करत आहे. सिद्धबेट, इंद्रायणीनगर, गोपाळपुरा आदी भागात नदीपात्रात मूर्तींचे सर्रास विसर्जन सुरू आहे. मात्र, प्रशासनाने यावर अद्याप कारवाई केली नाही. परिणामी नागरिक मूर्ती विसर्जनाबाबत संभ्रमात आहेत.
नागरिकांनी मूर्ती घरीच पाण्यात विसर्जन करून शाळेच्या मैदानावर श्री फउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे मूर्तीदानासाठी मुर्त्या जमा करायच्या आहेत. गणेशभक्तांनी नदी पात्रात विसर्जनाचा प्रयत्न करू नये.
- अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.