esakal | सरकारी काम अन् सहा वर्ष थांब; भिगवणमधील शवविच्छेदन केंद्राची अवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

death.jpg

भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन केंद्र मागील सहा वर्षापासून बंद आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघाती किंवा अकस्मिक मृत्युचे येथे मोठे प्रमाण आहे. अशा वेळी नातेवाईकांना इंदापूर किंवा बारामती येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जावे लागतात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र तातडीने सुरु करावे व दिरंगाईस जबाबदार घटकांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

सरकारी काम अन् सहा वर्ष थांब; भिगवणमधील शवविच्छेदन केंद्राची अवस्था

sakal_logo
By
प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन केंद्र मागील सहा वर्षापासून बंद आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघाती किंवा अकस्मिक मृत्युचे येथे मोठे प्रमाण आहे. अशा वेळी नातेवाईकांना इंदापूर किंवा बारामती येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जावे लागतात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र तातडीने सुरु करावे व दिरंगाईस जबाबदार घटकांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

मोठी बातमी : 'या' पाच प्रभागांतील निम्म्या पुणेकरांना कोरोनाची लागण; सर्व्हेतून पुढे आली माहिती!

याबाबत भाजप युवा मोर्चा बारामती लोकसभा विभागाचे अध्यक्ष तेजस देवकाते यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. सहा वर्षापूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीबरोबरच येथील शवविच्छेदन इमारतही पाडण्यात आली व येथील शवविच्छेदन केंद्र बंद करण्यात आले.

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

शवविच्छेदन केंद्र पाडताना काही दिवसांत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतू, मागील सहा वर्षामध्ये येथील शवविच्छेदन केंद्र सुरु न झाल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताने किंवा अकस्मित मृत्यू झाल्यास आधीच विवंचनेत असणाऱ्या नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी इंदापूर किंवा बारामती येथे मृतदेह घेऊन जावे लागते.

Big Breaking : पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा उच्चांक; एकाच दिवसात 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू   

यामध्ये बराच वेळ जातो व मनस्तापही सहन करावा लागतो. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र तातडीने सुरु करावे व दिरंगाईस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशी मागणी तेजस देवकाते यांनी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चा बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष तेजस देवकाते म्हणाले, सरकारी काम व सहा महिने थांब अशी म्हण होती. परंतु भिगवण येथील शवविच्छेदन केंद्राबाबत सरकारी काम आणि सहा वर्षे थांब अशी व स्थिती झाली आहे. शवविच्छेदन केंद्र बंद झाल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. भिगवण येथील शवविच्छेदन केंद्र तातडीने सुरु करावे, या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याची नेमणुक करावी व दिरंगाईस कारणीभुत घटकांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करु.