बाजार बंद अन्‌ खरेदीदार न आल्याचा रताळ्यांना फटका 

प्रवीण डोके
सोमवार, 29 जून 2020

आषाढी एकादशीनिमित्त रताळ्यांना मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाचा फटका रताळ्यांनाही बसला आहे.

मार्केट यार्ड (पुणे) : आषाढी एकादशीनिमित्त रताळ्यांना मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाचा फटका रताळ्यांनाही बसला आहे. यंदा बाजारात बाहेरगावाहून खरेदीदारच आले नाहीत. तसेच, शहरातील कंटेन्मेंट झोन आणि काही किरकोळ बाजार बंद आहेत, त्यामुळे रताळ्यांना कमी मागणी असून आवकही गेल्यावर्षाच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांनी घटली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आषाढी एकादशी, नवरात्रोत्सवासह गोकूळ अष्टमी, महाशिवरात्र, कार्तिकी एकादशी या दिवशी बहुतांश लोक उपवास करतात, त्यामुळे या काळात उपवासासाठी रताळ्यांना जास्त मागणी असते. आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे, त्यामुळे बाजारात रताळ्यांची आवक झाली आहे. 
- अमोल घुले, 
व्यापारी, मार्केट यार्ड 
 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

 

एक एकर शेतामध्ये रताळ्याची लागवड केली आहे. पाऊस चांगला झाल्याने रताळ्यांचे उत्पादन चांगले झाले आहे. सध्या कोरोना संसर्गाची परिस्थिती असतानाही मिळणारा भाव समाधानकारक आहे. 
- अतुल बापू पाटील, 
शेतकरी (मांजरगाव, ता. करमाळा) 
 

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

सोलापूर, करमाळा : सुमारे 1300 पोती 
घाऊक बाजार : 10 किलो : 300 ते 350 रुपये 
किरकोळ बाजार : एक किलो : 45 ते 50 रुपये 
वैशिष्ट्ये : गावरान आणि आकाराने लहान. चव गोड असते, त्यामुळे या रताळ्यांना मोठी मागणी असते. भावही जास्त असतो. 

कर्नाटक : सुमारे 300 पोती आवक 
घाऊक बाजार : 10 किलो : 180 ते 200 रुपये 
किरकोळ बाजार : एक किलो : 30-40 रुपये 
वैशिष्ट्ये : आकाराने मोठी आणि तुरट असतात, त्यामुळे तुलनेने मागणी कमी. भावही कमी असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand Decline of sweet potato