मांजरी (ता. हवेली) खोतेदार व्यापारी बंद करून शेतकरी ते थेट ग्राहक या मागणीसाठी आंदोलनास बसलेले शेतकरी.
मांजरी (ता. हवेली) खोतेदार व्यापारी बंद करून शेतकरी ते थेट ग्राहक या मागणीसाठी आंदोलनास बसलेले शेतकरी.sakal

Uruli Kanchan : शेतकरी ते थेट ग्राहक व्यापार करण्याची मागणी ; संचालकांचा विरोध,शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

उप बाजार समिती मांजरी येथे खोतीदाऱ्यांच्या चाललेल्या अनागोंदी कारभारामुळे अल्प भूधारक शेतकरी वर्ग हा हतबल झाला असून या विरोधात पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठ, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, वळती, शिंदवणे, थेऊर, सोरतापवाडी, टिळेकरवाडी, अष्टापूर, भवरापूर, खामगाव टेक आदी गावांतील शेतकरी एकजूट होऊन आक्रमक झाले आहेत.

उरुळी कांचन : उप बाजार समिती मांजरी येथे खोतीदाऱ्यांच्या चाललेल्या अनागोंदी कारभारामुळे अल्प भूधारक शेतकरी वर्ग हा हतबल झाला असून या विरोधात पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठ, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, वळती, शिंदवणे, थेऊर, सोरतापवाडी, टिळेकरवाडी, अष्टापूर, भवरापूर, खामगाव टेक आदी गावांतील शेतकरी एकजूट होऊन आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी मांजरी उप बाजार परिसरात आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ते ग्राहक असा थेट माल विकण्याची मागणी संचालक मंडळाकडे केलेली आहे. ही मागणी मान्य न केल्यास पुणे- सोलापूर रस्ता आडवून शेत माल विकणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संचालक मंडळांपैकी प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, शशिकांत गायकवाड, राजाराम कांचन, मनीषा हरपळे, अनिरुद्ध भोसले, नानासाहेब आबनावे, नितीन दांगट, दत्तात्रय पायगुडे, लक्ष्मण केसकर, सारिका हरगुडे या संचालकांनी मांजरी उप बाजारात खोतीदारांना परवानगी दिली आहे. तर संचालक सुदर्शन चौधरी हे शेतकरी ते थेट ग्राहक या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहेत.

 मांजरी (ता. हवेली) खोतेदार व्यापारी बंद करून शेतकरी ते थेट ग्राहक या मागणीसाठी आंदोलनास बसलेले शेतकरी.
Uruli Kanchan News : खासगी सावकार स्वप्नील कांचन प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा दणका

गेली वीस वर्ष बाजार समिती येथे प्रशासक होते. या दरम्यान तेथे अनागोंदी कारभार चालू होता. मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापारी व दुबार विक्रेते वाढले होते. हे खोतीदार व्यापारी मजुरांकरवी शेतकऱ्याच्या शेतातील माल काढायचे आणि तो माल थेट उप बाजार समितीत आणायचा आणि विकायचा असा प्रकार गेली वीस वर्ष मनमानी कारभार चालू होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी बाजार समितीवर संचालक मंडळ निवडून आले. अॅाक्टोबर पासून खोतीदार व दुबार विक्रेते बंद करून मुळ संकल्पना असलेला शेतकरी ते थेट ग्राहक चालू केला व खोतीदार व दुबार व्यापारी बंद केले.

मात्र, खोतीदार व्यापारी यांनी काही संचालक व एक शेतकरी संघटना यांना हाताशी धरून मोठे शेतकरी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केला.त्यामुळे ४१ खोतीदार व्यापारी अटी शर्तीवर चालू करण्याचा ठराव संचालक मंडळाने केला. संचालकांवर व्यापारी दबाव टाकून गुंडगिरी चालू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या खोतीदार व दुबार विक्रेत्यांना कुणाचे पाठबळ आहे, तसेच या विक्रीला काही नेते पाठबळ देणार असल्याची चर्चा सध्या हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.

मांजरी मार्केट ही संकल्पना शेतकरी टू ग्राहक अशी आहे. गेल्या तीन महिन्यापासून संचालकांनी खोतीदार व दुबार विक्री करण्यास बंदी घातली होती. त्यांच्या निर्णयामुळे आमचा शेतकरी खूप समाधानी होता. आम्हाला मार्केटमध्ये जागा मिळायला लागली. आमच्या भाजीपाला मालाला चांगला भाव पण मिळाला, त्यामुळे आमच्या शेतकरी वर्गात खूप समाधान होतं. परंतु, आता काही संचालक मंडळांनी खोतीदार व दुबार विक्रेत्यांना पुन्हा मार्केटमध्ये विक्री करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे आमच्या शेतीमालाला भाव मिळणार नाही. त्यांनी हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.

- किरण कुंजीर, शेतकरी, वळती

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक बाजाराचे वैशिष्टे व घटना नमुद असून त्यामध्ये मांजरी उपबाजार हा शेतकरी ते खरेदीदार अशा स्वरूपाचा आहे. तसेच मांजरी उपबाजारामध्ये कमी क्षेत्र असणारे ७० टक्के शेतकरी स्वतः माल काढून स्वतः विक्री साठी घेवुन येतात. मांजरी उपबाजारामध्ये खोतीदार चालू करावे की नाही याबाबत संबधित बाजार आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करावी.

खोतीदारांना व्यवसायास परवानगी दिल्यास त्या ठरावास माझी हरकत असेल. मांजरी उपबाजार हा रायतू बाजार असून शेतकरी ते ग्राहक असा आहे. त्यामुळे खोतीदार नसावा. कोरेगाव मुळ येथे ३० ते ३५ ओटे बांधुन ग्राहक येण्यासाठी प्रयत्न करावे. काही कालावधीसाठी बाजार फी माफ करावी तसेच खोतीदाराने सकाळी ११.०० ते १.३० वा. त्यांनी आणलेला माल कोरेगाव मुळ येथे विक्री करावा उर्वरीत राहिलेला माल बाजार समितीच्या कर्मचान्यांना दाखवून त्याप्रमाणे त्याची नोंद पावती घेऊन उर्वरीत माल तो मांजरी उपबाजारामध्ये विक्रीस आणण्याची परवानगी द्यावी. कोणत्याही परिस्थितीत मांजरी येथे खोतीदारांना परवानगी देण्यात येवू नये.

- सुदर्शन चौधरी, संचालक, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com