coronavirus: कोरोनामुळे आता वाढली मास्कची मागणी

The demand for masks now increased pune due to Corona.jpg
The demand for masks now increased pune due to Corona.jpg

पुणे : कोरोना विषाणूंच्या संसर्गाची भीतीमुळे शहरात एका सर्जिकल मास्कच्या किंमत दोनवरून 15 ते 18 रुपये झाली आहे. ग्राहकांकडून वाढत्या मागणीमुळे व्यापाऱ्यांनी मास्कची मागणीही वाढविली असल्याची माहिती बाजारपेठेतून मिळते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या शेजारी असलेल्या चीनसह जगातील 24 देशांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना या गटातील हा नवीन कोरोना विषाणू आहे. त्यावर अद्यापपर्यंत ठोस उपचार नाहीत. त्याच्या लक्षणांवर आधारित उपचार सध्या जगभरात सुरू आहेत. पुण्यात गेल्या बारा वर्षांपूर्वी स्वाइन फ्ल्यूच्या 'एन1एन1' या विषाणूंच्या संसर्गाचा प्रचंड मोठा उद्रेक झाला होता. त्यामुळे आता नवीन कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती नागरिकांमध्ये वाढत आहे. त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्जिकल मास्कचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातून पुण्याच्या बाजारपेठेतील मास्कची मागणी वाढली असून, दोन रुपयांचा सर्जीकल मास्क आता 15 ते 18 रुपयांना विक्री होत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

SuperExclusive:पुणे देणार कोरोना प्रतिबंधक लस

शिंगणे, खोकणे, थुंकणे यातून नवीन कोरोनाचा संसर्ग होतो. हा विषाणू थेट श्‍वसन संस्थेवर आक्रमण करतो. या विषाणूंनी श्‍वासातून शरीरात प्रवेश करू नये, त्याला रोखला यावे यासाठी मास्क वापरणाऱ्या नागरिक वाढत असल्याचे दिसत आहे.

एक लाखावरून 50 लाखांपर्यंत मागणीत वाढ
सर्जिकल मास्कला पूर्वी फक्त रुग्णालयांमधून मागणी होती. शहरातील वेगवेगळ्या रुग्णालये, दवाखाने यातून एका महिन्यात एक लाख सर्जिक मास्कची खरेदी होत असे. पण, आता रुग्णालयांबरोबरच नागरिकांकडूनही मास्कची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने त्याची मागणी 50 लाखांवर पोचली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कुठे होतेय विक्री?
शहरातील औषध दुकानांपासून सर्जिकल वस्तू मिळणाऱ्या दुकानांपर्यंत सगळीकडे मास्कची किंमत वाढली आहे. या दुकानांमधून दिवसाला काही मोजकेच मास्क विक्री होत. पण, पूर्वीच्या दिवसभराच्या मास्कची विक्री आता तासा-दोन तासांमध्येच होते.

कोण वापरतंय मास्क?
- शाळेत व्हॅनमधून जाणारी मुलं
- फिरायलाय जाणारे ज्येष्ठ नागरिक
- गर्भवती, मधुमेही, हृदयविकाराचे रुग्ण
- मोठी शस्त्रक्रिया झालेले रुग्ण

"मास्कची वाढीव दराने विक्री न करण्याच्या सूचना संबंधित परवानाधारकांना यापूर्वीच बैठक घेऊन दिल्या आहेत. त्यानंतरही मास्कची महागड्या दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,''
- एस. बी. पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग.

सर्जीकल मास्कमुळे "एच1एन1' किंवा नवीन कोरोना अशा विषाणूंचा संसर्ग टाळता येत नाही. या मास्कची ती क्षमता नसते. संसर्ग टाळण्यासाठी "एन 95' या मास्कचा वापरावे लागता. पण, आत्ताच्या स्थिती पुण्यात विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करण्यासाठी मास्क वापरण्याची गरज नाही,''
- डॉ. शरद आगरखेडकर, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com