प्रतिकारशक्ती वाढीसाठी सुकामेव्याला मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुकामेव्याच्या मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. तसेच मागील काही महिन्यांपासून त्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. अनेकांनी सुकामेव्याचा ऑनलाइन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळेदेखील मागणीत वाढ झाली आहे.

मार्केट यार्ड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुकामेव्याच्या मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. तसेच मागील काही महिन्यांपासून त्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. अनेकांनी सुकामेव्याचा ऑनलाइन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळेदेखील मागणीत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना प्रादुर्भावामुळे सुरवातीच्या टप्प्यात घाऊक बाजारपेठेतील व्यापारावर परिणाम झाला होता. परंतु शासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापार काही प्रमाणात सुरळीत होत आहे. बाजारात बदामाची आवक अमेरिका व इराणमधून होत आहे. गोवा, केरळ, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, तसेच मंगळुरू येथून काजूची आवक होत आहे. बेदाण्याची आवक सांगली येथून होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी नवीन गोयल यांनी दिली.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

इराण आणि अमेरिकेतून पिस्त्याची आवक होते. पुढील महिन्यात काश्‍मीरमधील अक्रोडचा हंगाम सुरू होणार आहे. अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for nuts to boost immunity