esakal | अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे आणि परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पहाटे रद्द करण्यात आल्या. मात्र, हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील प्राचार्य करत आहेत.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे आणि परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पहाटे रद्द करण्यात आल्या. मात्र, हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील प्राचार्य करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचले असून  दौंड ,बारामती, भोर, इंदापूर भागात ओढ्यांना, नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे रहदारीवर परिणाम झाला आहे. विजेचे खांब कोसळले असून काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अतिवृष्टीचा विचार करता विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु अजूनही पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित असून ते पूर्ववत होण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर ऑफलाइन परीक्षेसाठी पोहोचण्यास आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाईल रिचार्ज, इंटरनेट सेवा विस्कळित झाल्याने ऑनलाइन परिक्षा देण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. 

लोहगाव विमानतळावरच आता आरटीपीसीआर चाचणी ! 

'अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज पुरवठा खंडीत झाला असून काही भागात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. पावसामुळे विस्कळीत झालेले ग्रामीण जीवन सुरळीतपणे सुरू होण्यास काही वेळ लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करावा."
विद्यार्थी हित लक्षात घेऊन शनिवारपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात.
- डॉ. संजीव लाटे, प्राचार्य, अमृतेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ( ता. विंझर) 

पावसाने जिल्ह्यात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाले

'पावसामुळे गुरूवारी तब्बल १२ ते १८ तास वीज पुरवठा खंडित झाला आहे. संपूर्ण दिवस इंटरनेट कनेक्टिविटी नाही. शुक्रवारी काय परिस्थिती असेल, ते सांगता येत नाही. परंतु वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा सुरळीत न झाल्यास ऑनलाइन परीक्षा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलाव्यात."
- मदन कुऱ्हे, विद्यार्थी, जुन्नर 

Edited By - Prashant Patil