पुण्यातील 'तो' वादग्रस्त फलक हटवण्याची मागणी

pool.jpg
pool.jpg
Updated on

मयुर काॅलनी (पुणे) : पुणे महापालिकेच्या वतीने कोथरुडमधील पहिला उड्डाणपुल दशभुजा गणपती येथे बांधण्यात आला. या पुलाचे काम १९९६ साली सुरु झाले. त्यावेळी या पुलाचे नामकरण स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर असे करण्यात आले. आता या पुलाखाली नव्याने जो नामफलक बसवण्यात आला आहे, त्यावर संकल्पना म्हणून आमदार चंद्रकांत पाटलांचे नाव टाकण्यात आले आहे. यावरून चांगलाच वाद सुरू झाला आहे. 

दरम्यान, इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा हा उद्योग आहे. फलक लावण्याची संकल्पना तुमची असेल पुल उभारण्याची नव्हे. त्यामुळे फलकावर या बाबी पण स्पष्ट केल्या असत्या तर बरे झाले असते. मुळातच अशा प्रकारे नागरिकांच्या खर्चातून फलक लावतातच कशाला. रस्ता, पुल, वा महत्वाच्या ठिकाणी लावले जाणारे नामफलक, दिशादर्शक फलकांवर अशाप्रकारे स्वतःचे नाव लावणे हे बंद करावे. सदर बोर्ड पुढील ७ दिवसात काढला नाही तर महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या माध्यमातून तो काढण्यात येईल अशी मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

यावेळी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे प. महा. संपर्क प्रमुख संजय गुलाबराव जोशी पिं.-चिं. शहराध्यक्ष गणेश मारूती जोशी, पुणे शहराध्यक्ष शेरू परदेशी, पुणे शहर महिला अध्यक्षा शुभांगी (सीमा) महेश हेंद्रे, पिं.-चिं. शहर उपाध्यक्ष सुजीत हंडे,
पुणे शहर उपाध्यक्ष विनोद परदेशी, उ. महा. संपर्क प्रमुख
संदीप निकम, गोगा सुपेकर, कुणाल हेंद्रे, अक्षय पवार, अमित साळुंखे, स्वप्निल जोशी, शैलेश हेंद्रे, निखिल जोशी, संदेश जोशी इ. उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Purandar International Airport Land Acquisition to Accelerate After June 30 Deadline Extension
Structural Audit of Eight Major Dams in Pune Launched to Enhance Safety and Lifespan
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Strict Action Against Rule Violators as State Launches POSH Law Inspection Drive
Marathi News Esakal
www.esakal.com