पाषाणमधील नागरिक म्हणताहेत 'तो' भाग सील करा;  तर प्रशासन म्हणतय...

बाबा तारे
रविवार, 28 जून 2020

पाषाण गावठाण, सुतारवाडी, सूस रस्ता या परिसरातील वाढती रुग्णसंख्या येथील नागरिकांसाठी चिंतेची बाब बनत आहे. पाषाण परिसरात निम्हण मळा, संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी हा दाट लोकवस्तीचा तर सूस रस्ता परिसरात सोसायटी बहूल असल्याने एकूणच संमिश्र लोकवस्ती असलेला हा भाग आहे.

औंध (पुणे) : पाषाण गावठाण, सुतारवाडी, सूस रस्ता या परिसरातील वाढती रुग्णसंख्या येथील नागरिकांसाठी चिंतेची बाब बनत आहे. पाषाण परिसरात निम्हण मळा, संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी हा दाट लोकवस्तीचा तर सूस रस्ता परिसरात सोसायटी बहूल असल्याने एकूणच संमिश्र लोकवस्ती असलेला हा भाग आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंत पाषाण परिसरात ५३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाषाण गावठाणात दहा, सुतारवाडी येथे चार, सूस रस्ता परिसरात तीन, महामार्गाजवळ एक तर  एका सोसायटीत तीन याप्रमाणे परिसरात एकूण एकवीस रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता परिसरातील दाट लोकवस्तीचा भाग सील करण्यात यावा अशीही मागणी केली जात आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

कारण ब-याच ठिकाणी नियमांचे पालन न करता बिनधास्तपणे नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे अधिकच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर प्रशासकीय यंत्रणांनी सुद्धा कडक धोरण अवलंबिले पाहिजे. कारण विना मास्क फिरणारे, सुरक्षित अंतर न पाळणारे  व एकूणच या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करुन फिरणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी तरच इतरांना वचक बसेल अशा प्रतिक्रिया काही नागरिकांकडून येत आहेत. 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

जेथे जेथे रुग्ण सापडले तो परिसर विरळ असला तरीही इतर भागात दाट लोकवस्ती आहे. अशा परिस्थितीत येथे कोरोनाचे संक्रमण झाले तर रुग्ण संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून काळजी घेणे गरजेचे आहे. रुग्णांचा आकडा वाढत असला तरी विरळ भागातच जास्त रुग्ण असल्याने हा भाग सील करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for sealing of densely populated part of Pashan