आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Dhangar-Society-Agitation
Dhangar-Society-Agitation

पुणे- महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच धनगर समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ व सकल धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भात व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ व सकल धनगर समाजातर्फे पुणे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांना निवेदन दिले. 

धनगर समाजासाठी (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेमध्ये दिले असून त्या आरक्षणाची अंमलबजावणी मागणी धनगर समाज गेल्या 70 वर्षांपासून करीत आहे. तर धनगर व धनगड हा शब्द एकच असून हा वाद संपुष्ठात आला आहे, तरी सरकारने धनगर समाजाचा आरक्षणाचा अध्यादेश लवकरात लवकर काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे . तसेच धनगर समाजातील मेंढपाळावरती वेळोवेळी होणारे हल्ले थांबविण्यासाठी सरकारने कायदा करावा . या कायद्याची अंमलजबावणी कडक स्वरूपात करावी. धनगर समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. हा निधी उद्धव ठाकरे सरकारने उपलब्ध करून द्यावा. जर आरक्षण मिळाले नाही तर राज्यभर रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल धायगुडे यांनी दिला आहे. 

माजी आमदार रामराव वडकुते यांनी सांगितले की, धनगर समाजासाठी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी धनगर समाज सन 1980 पासून संघर्ष करीत आहे. परंतु, वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही राज्य शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे समाजात शासनाविषयी रोष आहे. तरी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊन अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 

या आंदोलनामध्ये वडकुते, धायगुडे यांच्यासह महादेव वाघमोडे, बाबाराजे कोळेकर, राजेंद्र कोळेकर, मीना थोरात, शुभांगी कारंडे, माउली ठोंबरे , ऍड. उज्ज्वला हाके, चंद्रशेखर सोनटक्के, बाबुराव बनसोडे, लता लाळे, विकास लवटे, सुवर्णा धायगुडे, फुलचंद राघोजी, बाळासाहेब डफळ, जयवंतराव कवितके, योगेश खरात, भगवान शिंदे, संतोष वाघमोडे, गणेश पुजारी, शिवाजी काळे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com