दस्त नोंदणी रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार; 3 टक्के स्टँप ड्युटीसाठी आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

राज्य सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी एक सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. ​

पुणे : दस्त नोंदणीसाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारणीबाबत सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी (ता. 31) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी बुधवारी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक कार्यालयातून देण्यात आली. 

श्वान आणि रिक्षावाल्याची हृदयस्पर्शी गोष्ट; लेखिकेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल!​

राज्य सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी एक सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांना दस्त नोंदविता यावेत, यासाठी डिसेंबर महिन्यात शनिवारीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती. 

दरम्यान, ज्या नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प खरेदी केले आहेत. त्यांना पुढील चार महिन्यांपर्यंत तीन टक्‍के सवलतीचा लाभ मिळणार आहे, असे नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले. 

नव्या कृषी कायद्यांबाबत भीती ठरतेय खरी; व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक!​

मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात दोन टक्‍के सवलत 
राज्य सरकारने एक जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात आणि प्रभाव क्षेत्रांतील गावांमध्ये तीन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस (एलबीटी) असा चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, ग्रामीण भागात दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस असे तीन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. 

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department of Stamp duty and registration will continue until 9pm on Thursday 31st December

Tags
टॉपिकस
Topic Tags: