बारामतीचे लग्न...वऱ्हाड निघाले नगरला...अन् अजित पवार

मिलिंद संगई, बारामती
Thursday, 7 May 2020

अडचणीच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केल्याने बारामती परिसरातील लग्न सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत नगरमधील श्रीरामपुर येथे होेणार आहे.

बारामती : कारोनामुळे लॉकडाउनच्या काळात सध्या सगळेच ठप्प आहे. त्यामुळे लगीनसराई देखील ठप्प झाली आहे. आता सगळ्यांचेच लग्नसमारंभ रखडले आहेत. अशा अडचणीच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केल्याने बारामती परिसरातील लग्न सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत नगरमधील श्रीरामपुर येथे उद्या होेणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीतील मोहन भटीयानी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सिमरन खुराना या भाचीचे लग्न तीन महिन्यांपूर्वी ठरले होते. मुहूर्तही 8 मेचा निश्चित करण्यात आला होता. परंतू कोरोनामुळे त्यात विघ्न आले.गेल्या तीन दिवसांपासून पाससाठी प्रयत्न सुरु होते. पास मिळाला नाही, तर लग्न कसे करायचे हा प्रश्न सर्वांपुढे होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, काहीही अडचण आली तरी बारामतीकर धाव घेतात ती पवार कुटुबीयांकडे. यामुळेच यावेळी देखील मोहन भटीयानी यांनी अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. उद्याचा मुहूर्त ठेवून पासची व्यवस्था करण्यास आपल्या स्वीय साहय्यकास सांगितले. 

पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात 'या' गोड बातमीने

दरम्यान, पवार यांचे स्वीय साहय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी चक्रे फिरवून चार जणांच्या पासची व्यवस्था केली. मग काय हे चार जणांचे वर्हाड श्रीरामपूरकडे रवाना झाले. 

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा अर्ज भरण्याबाबत पुणे विद्यापीठाने केली महत्त्वाची घोषणा!

आम्ही बारामतीकर आहोत, आमच्या सर्वांच्या पाठीशी पवार कुटुंबीय नेहमीच ठामपणे राहते. त्यामुळे पासची काही अडचण येणार नाही, अशी खात्री होती. आमच्या घरातील मंगल कार्य आता निर्विघ्नपणे पार पडेल- मोहन भटीयानी, बारामती

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar helps married family