esakal | अजितदादांचा इशारा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही... 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. या संदर्भातील उपाययोजना करताना हलगर्जीपणा झाला, तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

अजितदादांचा इशारा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह बारामती तालुक्यातही वेगाने पसरू लागला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. या संदर्भातील उपाययोजना करताना हलगर्जीपणा झाला, तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

बारामतीतील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहावर आज आयोजित बैठकीत पवार बोलत होते. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास ओहोळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, संभाजी होळकर उपस्थित होते.

लाॅकडाउनमध्ये रविवारपासून पुणेकरांना दिलासा

बारामती तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत अजित पवार यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्य सूचना अधिका-यांना दिल्या. कोरोनाच्या रुग्ण तपासणीसह इतर बाबतीत आरोग्य विभागासह सर्वच संबंधित यंत्रणांनी व्यवस्थित काम करावे, अशी सूचना केली. मात्र, कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच, संस्थात्मक क्वारंटाइन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. बारामती शहरातील खासगी रूग्णालय कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घ्यावात. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असे पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसूत्रता येईल. कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहीजेत, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.