अजितदादांसारखा विश्वास निर्माण करणे आव्हानात्मक : अमोल कोल्हे

बंडू दातीर
Tuesday, 28 July 2020

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्टवक्तेपणाबाबत राज्यात प्रसिद्ध आहे. समाजकारण किंवा राजकारणामध्ये काम करत असताना दादांसारखा विश्वास सामान्य जनतेमध्ये निर्माण करणे व तो टिकवून ठेवणे, हे अतिशय आव्हानात्मक आहे, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

पौड (पुणे) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्टवक्तेपणाबाबत राज्यात प्रसिद्ध आहे. समाजकारण किंवा राजकारणामध्ये काम करत असताना दादांसारखा विश्वास सामान्य जनतेमध्ये निर्माण करणे व तो टिकवून ठेवणे, हे अतिशय आव्हानात्मक आहे, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने ऑनलाईन घेतलेल्या अनंत व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या परिस्थितीत बेफिकीरीपणा आणि धास्ती, अशा दोन विभिन्न टोकाची माणसे पहायला मिळतात. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत सर्वांनी सावधगिरीपणा बाळगला पाहीजे. कोरोना हा पूर्णविराम नसून, स्वल्पविराम आहे. आयुष्य सुंदर बनविण्यासाठी सकारात्मक रहा.

आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला...  

या वेळी सार्वजनिक आरोग्य, समाजकारण, राजकारण, कला, ऑनलाईन शिक्षण, पर्यटन, युवकांची भूमिका या विषयांवर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कोल्हे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. तसेच, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेणे यांनी अजित पवार यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली. या वेळी लेखक- दिग्दर्शक तेजपाल वाघ, पार्श्वगायक संदीप उबाळे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव आदी उपस्थित होते.

मंदिर बंद असले तरी या ग्रामस्थांनी अशी सांभाळली परंपरा... 

प्रास्ताविकात अॅड. कदम यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त घेतलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अजितदादांच्या वाढदिवसानिमीत्त संस्थेने घेतलेल्या ऑनलाईऩ राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशासह इंग्लडमधील तज्ज्ञांनीही सहभाग घेतला होता. अनंत व्याख्येनामालेतून सध्य परिस्थितीसह इतर क्षेत्रातील घडामोडींबाबत व्याख्याने झाली. विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या ई- पोस्टर प्रेझेंटेशन, चित्रकला, निबंध स्पर्धा, ई- कन्टेन्ट डेव्हलपमेंट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी घर, शेती परिसरात रोपटे लावून त्याच्या संवर्धनाची शपथ घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्यावतीने घेतलेल्या 'इ- पोस्टर प्रेझेंटेशन' स्पर्धेचा निकाल प्राचार्य डॉ. पंडीत शेळके यांनी जाहीर केला.डॉ. माया माईनकर यांनी सूत्रसंचालन केले. एल. एम. पवार यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar's work Appreciation from MP Amol Kolhe