अरे बापरे! एक नव्हे, दोन नव्हे तर भारताच्या १०० पट जास्त कोरोनाचा कहर अमेरिकेत!

Corona-USA
Corona-USA

पुणे : जागतिक महासत्ता म्हणविणाऱ्या अमेरिकेत कोरोना महामारीने सर्वात जास्त धूमाकूळ घातला आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनाने 100 पटींने अधिक उग्र स्वरुप धारण केले आहे. अमेरिकेच्या तुलनेत देशात कोरोनाचा प्रसार कमी झाल्याची बाब आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून स्पष्ट होत आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येकी दहा लाख लोकांमागे 3 हजार 816 कोरोनाबाधीत सापडतात, तर भारतात हीच संख्या फक्त 38 एवढी आहे. 

'वर्ल्डओमिटर' या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या कोरोनासंबंधीच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्‍लेषण करण्यात आले आहे. अमेरिकेत 10 लाख लोकसंख्येमागे 226, तर देशात फक्त एक ते दोन व्यक्तींची कोरोनामूळे मृत्यू झाल्याचे प्रमाण आहे. देशात कोविड-19चा संसर्ग आणि मृत्यूदराप्रमाणे कोरोनाच्या चाचणीचा वेगही कमी आहे. असे जरी असले तरी तुलनात्मक दृष्ट्या बाधितांची सापडणारी संख्या देशात कमीच आहे.

देशाच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि घनता बघता कोरोनाचा प्रसार तुलनेने कमी झाल्याचे यातून स्पष्ट होते. निश्‍चितच लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झाला आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली आहे. आता जर सोशल डिस्टन्सींगचे पालन झाले नाही तर हे आकडे बदलायला फार वेळ लागणार नाही. 

देशातील कोरोना चाचणी वेग 
अमेरिकेत भारताच्या तुलनेत 25 पटींनी अधिक कोविड-19च्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना बाधीतांची संख्या कोरोनाच्या झालेल्या कमी चाचण्यांमूळे पुढे येत नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. परंतू, प्रत्यक्ष चाचणीनंतर सापडणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेच्या तुलनेत भारतात पाच पटीने कमीच आहे. 

- हुश्श! सुटलो रे बाबा एकदाचा : पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची पहिली बस रवाना

अमेरिकेत मृतांची टक्केवारी जास्त 
अमेरिकेत भारतापेक्षा अडीच पटीने जास्त कोरोना बाधित रुग्ण दगावत आहे. तर, देशात शंभर पैकी 90 तर अमेरिकेत शंभर पैकी 74 रुग्ण बरे होऊन घरी परतत आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकेत आरोग्य सुविधा उत्तम असतानाही बाधीतांच्या वाढत्या संख्येमुळे ती कोलमडण्याच्या स्थितीत आहे. भारतात ही संख्या अशा वेगाने वाढली तर कल्पनाच नको. त्यामुळे नागरिकांनी तिसऱ्या लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टंसींगसह नियमांच काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. 

सूचना : संबंधित आकडेवारी वर्ल्डओमिटर या संकेतस्थळावरील दुपारी एक वाजताची आहे. कदाचित 1 ते 0.5 टक्‍क्‍याने आकडेवारी मागे पुढे असू शकते. परंतु आकडेवारीचा कल आणि प्रमाण योग्य आहे. 

प्रती दहा लाख लोकांमागील प्रमाण 
तपशील : भारत : अमेरिका : जग 
कोविड-19च्या चाचण्या : 984 : 24,116 : उपलब्ध नाही 
कोरोना बाधितांची संख्या : 38 : 3816 : 492 
कोरोनामूळे मृत्यू : 1.3 : 226 : 34 

कोरोनाबाधीतांची टक्केवारी 
भारत : 1.38 टक्के 
अमेरिका : 32.98 टक्के 

चाचणीच्या तुलनेत सापडणारी बाधितांचे संख्या 
भारत : 3.86 टक्के 
अमेरिका : 15.77 टक्के 

कोरोना बाधितांचे मृत्यू : बरे होणारे 
भारत : 10 टक्के (1,787) : 90 टक्के (15,331) 
अमेरिका : 26 टक्के (74,809) : 74 टक्के (2,13,109) 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com