उपमुख्यमंत्र्यांनी जळगाव सुपेला दिली भेट अन्...

Ajit_Pawar
Ajit_Pawar

उंडवडी : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.२१) भेट देऊन विविध विकास कामांची आणि रोजगार हमीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी रोजगार हमीची कामे उत्कृष्ट पद्धतीने करत असल्यामुळे ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक आणि हजेरी सहाय्यक यांचा सत्कार करुन झालेल्या कामाबद्दल कौतुक केले. 

यावेळी प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, दूधसंघाचे संचालक तानाजी खोमणे, अनिल जगताप, दत्तकृपा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, पंचायत समितीचे माजी उपसभापती शारदा खराडे, बिल्डर्स असोसिएशन माजी अध्यक्ष राजेंद्र खराडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सरपंच लक्ष्मणराव सरपंच अंजना खोमणे, उपसरपंच मीराबाई जगताप, दादासो खोमणे, ग्रामसेवक गणेश लडकत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

येथे नुकतेच सहा लाख रुपये खर्चून संरक्षण भिंत तर सात लाख रुपये खर्चून व्यायाम शाळा बांधण्यात आली आहे. या कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. तसेच रोजगार हमीतून सुरु असलेल्या जळगाव सुपे ते अंजनगाव शिव रस्त्याची पाहणी देखील केली. यावेळी रोजगार हमीचे काम उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करुन दर्जेदार केल्याबद्दल ग्रामसेवक गणेश लडकत, ग्राम रोजगार सेवक राधेश्याम खोमणे, हजेरी सहाय्यक बापूराव जगताप यांचा उपमुख्यमंत्री पवार यांनी सत्कार केला. 

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "जळगाव सुपेतील विविध विकासकामे दर्जेदार झाली आहेत. नव्याने वृक्षारोपण करण्याकडे गावकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.'' 

येथे रोजगार हमीतून सुरू असलेले रस्त्याचे काम एक किलोमीटरपेक्षा जास्त झाले आहे. या कामावर 220 मजूर काम करत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com