
पुणे: ‘‘प्रभागरचनेसंदर्भात अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीची प्रभागरचना झालेली नाही. युतीच्या नादी न लागता आणि प्रभागरचनेवर रडत न बसता निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीसाठीच्या तीन महिन्यांत कष्ट करणारेच निवडून येतील. निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ३०) पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.