esakal | 'डॉक्टर, काय हवंय ते घ्या, पण...'; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे डॉक्टरांना साकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar

ससून रुग्णालयात येणारे रुग्ण इतर रुग्णालयांमधून फिरून आलेले होते. किंवा उपचारांसाठी उशिरा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे उपचारांना मर्यादा होत्या. 

'डॉक्टर, काय हवंय ते घ्या, पण...'; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे डॉक्टरांना साकडे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''डॉक्टर, तुम्हाला काय हवंय ते घ्या. इक्विपमेंट, व्हेंटीलेटर असे काय पाहिजे ते घ्या. फक्त पुण्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (डेथरेट) कमी झाले पाहिजे,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोना विषाणूंच्या संसर्ग झालेल्या रुग्णांचे वेगाने वाढणारे प्रमाण आणि त्याचबरोबर त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची वाढती संख्या हा राज्यापुढील काळजीचा विषय ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यात ते ससून रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलत होते. 

कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू ससून रुग्णालयात झाले आहेत. त्यामुळे हे रुग्णालयावर टीका सुरू झाली. त्यातून अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी मुंबईला बदली केली. त्यामुळे या आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

- अभिमानास्पद : स्वित्झर्लंडच्या पर्वतावर भारताचा तिरंगा

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरवातीला रुग्णांचे मृत्यू का झाले यामागील कारणांची विश्लेषण पवार यांना सांगितले. ससून रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण अत्यवस्थेत आले. दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता अत्यल्प होती. तसेच, त्यांचे वय आणि त्यांना इतर असलेल्या व्याधी यामुळे उपचाराला रुग्णाचा प्रतिसाद पुरेसा मिळत नव्हता. त्यातून यातील बहुतांश रुग्ण झाले असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

त्यावर पवार म्हणाले, “ससून रुग्णालयाला निधी कमी पडू देणार नाही. तुम्हाला काय उपकरणे हवी आहेत ती घ्या. त्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. फक्त मृत्यूचे प्रमाण कमी करा.”

- Coronavirus : सर्व्हेसाठी आलेल्या टीमवर हल्ला; इंदूरमधील दुसरी घटना

डॉक्टरांनी मांडलेले मुद्दे 
- पुण्यात उद्रेकाच्या सुरवातीला महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात रुग्णांना दाखल केले जात होते. पण, त्या सर्व रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरीही त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यात गुंतागुंत झाली नव्हती. पण, उद्रेकाच्या दुसऱ्या टप्प्यात संसर्गाची तीव्रता वाढली. रुग्णांमध्ये गुंतागुत होऊ लागली.
- ससून रुग्णालयात येणारे रुग्ण इतर रुग्णालयांमधून फिरून आलेले होते. किंवा उपचारांसाठी उशिरा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे उपचारांना मर्यादा होत्या. 
- दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली नाही, त्यामुळे तेथील मृत्यूचे प्रमाण कमी असणे स्वाभाविक आहे.

- कार्याला सलाम ! कुटुंबाची पर्वा न करता ते नागरिकांसाठी अहोरात्र रस्त्यांवर

अजित पवार म्हणाले...
-    ससून रुग्णालय आणि महापालिका यांनी एकत्र येऊन काम करा.
-    रुग्णांची देखभालीची वेळ वाढवा.
-    जंतूसंसर्गाचा दर कमी करा.
-    इतर रुग्णालयांची मदत घ्या.
-    ससून रुग्णालयांतील ताण कमी करण्याच्या उपाययोजना करा.