esakal | समाविष्ट गावांसाठी विकास आराखडा - खासदार गिरीश बापट

बोलून बातमी शोधा

Girish-Bapat

पुणे महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या २३  गावांमधील रहिवाशांचे जीवनमान उंचाविण्यासाठी गावांचा नव्याने विकास आराखडा (डीपी) तयार केला जाईल, असे खासदार गिरीश बापट यानी सोमवारी स्पष्ट केले. गावांसाठी पुरेशा प्रमाणात महापालिका निधी उपलब्ध करेल, मात्र, राज्य सरकारनेही आपली जबाबदार झटकू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समाविष्ट गावांसाठी विकास आराखडा - खासदार गिरीश बापट
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या २३  गावांमधील रहिवाशांचे जीवनमान उंचाविण्यासाठी गावांचा नव्याने विकास आराखडा (डीपी) तयार केला जाईल, असे खासदार गिरीश बापट यानी सोमवारी स्पष्ट केले. गावांसाठी पुरेशा प्रमाणात महापालिका निधी उपलब्ध करेल, मात्र, राज्य सरकारनेही आपली जबाबदार झटकू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शहरात महापालिकेच्या वतीने राबविलेले प्रकल्प, त्याची अंमलबजावणी, पुढच्या आर्थिक वर्षातील नियोजन या पार्श्वभूमीवर बापट यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची कामगिरी मांडली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हद्दीलगतची २३  गावे महापालिकेत आल्यानंतर तेथील विकासकामांच्या मुद्यांवरुन महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गावांच्या समावेशाचा उल्लेख करीत बापट यांनी राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवले मात्र महापालिकेची जबाबदारी म्हणून गावांना न्याय दिला जाईल, असे बापट यांनी सांगितले. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपविरोधात लढणार असली तरी, भाजपच्या राजकीय ताकदीवर परिणाम होणार नाही, भाजप, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि अन्य मित्र पक्षच निवडणुका जिंकतील त्यामुळे महापालिकेच्या २०२२  निवडणुकीत भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही खासदार बापट यांनी व्यक्त केला.

Breaking : पुण्यातील भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

भामा आसखेडचे उद्‌घाटन १ जानेवारीला
शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे उद्‌घाटन येत्या १ जानेवारीला होईल. त्यानंतर या भागातील रहिवाशांना रोज पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातून सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत, लोकवस्त्यांना नियमित पाणीपुरवठा होईल, यादृष्टीने नियोजन केल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि पालकांनो, जानेवारीच्या शेवटी प्रथम सत्र परीक्षा होण्याची शक्यता

महापौरांकडून ‘बीआरटी’ची पाहणी
पुणे- सातारा रस्त्यावरील ‘बीआरटी’ मार्गाची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पाहणी केली. त्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. या मार्गाचे काम संपवून तो लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी या वेळी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil