Pune News: पुण्याच्या पावसावर फडणवीसांचं भाष्य; म्हणाले, शंभर वर्षांच्या रेकॉर्ड...
मुंबई : पुण्याला सोमवारी मध्यरात्री रेकॉर्ड ब्रेक पावसानं चांगलचं झोडपून काढलं. सर्वत्र पाणी साचल्यानं पुणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता असल्यानं यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण दिलं आहे. (Devendra Fadnavis comment on Pune rains Said close to a hundred year record)
फडणवीस म्हणाले, पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही. पण जो पाऊस पडला त्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणावर साठलंय. पण काल पडलेला पाऊस हा गेल्या दहा वर्षातला सर्व रेकॉर्ड मोडून एका रात्रीत म्हणजे २४ तासात पडलेला सर्वात जास्त पाऊस आहे. हा १०० वर्षातल्या रेकॉर्डपेक्षा थोडा कमी आहे.
इतका पाऊस पडल्यानंतर ड्रेनेजची चर्चा हेते, पण पाण्याचा निचरा करण्यासाठी आपण स्ट्ऱॉंग वॉटर ड्रेन डिझाईनचा विचार केलेला नसतो. पुणे महापालिकेत पाच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली पुणे महापालिकेनं हे ड्रेन डिझाईन ४० वर्षांपूर्वी बनवलेलं आहे. पण आता अशा परिस्थितीत लवकरच ड्रेनेज डिझाईन झालं पाहिजे यासाठी महापालिका निश्चित करेल आणि तशा प्रकारचं डिझाईन देखील तयार करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.