अरे बापरे ! पुण्यातील 'या' गावात गेल्या तीन आठवड्यांपासून ना वीज, ना पाणी

भरत पचंगे
शनिवार, 4 जुलै 2020

धामारी (ता. शिरूर) येथील तीन वस्त्यांसाठी असलेला ट्रान्सफॉर्मर जळाल्याने या तीनही वस्त्या गेल्या तीन आठवड्यांपासून अंधारात आहेत.

शिक्रापूर (पुणे) : धामारी (ता. शिरूर) येथील तीन वस्त्यांसाठी असलेला ट्रान्सफॉर्मर जळाल्याने या तीनही वस्त्या गेल्या तीन आठवड्यांपासून अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्यावाचून हाल, जनावरांचे आणि शेतीला द्याव्या लागण-या पाण्यावाचून या तीनही वस्त्या व्याकुळ झाल्या असून कुठल्याही राजकीय नेत्यांना महावितरण दाद देत नसल्याने आम्ही आता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचा इशारा सरपंच सुवर्णा कापरे, माजी सरपंच संपत कापरे यांनी दिला.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

तीन आठवड्यांपूर्वी ऐन लॉकडाऊनच्या काळात कापरेवस्ती, डफळवस्ती व भगतवस्ती अशा तीन वस्त्यांसाठी असलेला ट्रान्सफॉर्मर जळाला आणि तत्काळ महावितरणला ही बाब कळविण्यात आली. पुढील काही दिवसात लगेच हा ट्रान्सफॉर्मर महावितरणने बसवून दिला. मात्र, हा नवीन ट्रान्सफॉर्मरही लगेच जळाल्याने या तीनही वस्त्या गेल्या तीन आठवड्यांपासून अंधारात आहेत. या तीनही वस्त्यांना पिण्याचे पाणी नाही. शेतीसाठी आणि जनावरांच्या घासासाठी आवश्यक पाणीही देता येत नसल्याने तीनही वस्त्यांचे पाण्यावाचून हाल हाल सुरू आहेत. याबाबत तातडीने दखल घ्यावी व ट्रान्सफॉर्मर बदलून द्यावा अन्यथा कोरोनाकाळात आम्ही आंदोलन करु अशा इशारा सरपंच सुवर्णा कापरे, माजी सरपंच संपत कापरे यांनी दिला. 

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

दरम्यान, वरील तक्रार आजी-माजी सर्व आमदार-खासदार, त्यांचे सचिव, सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे केली तरीही महावितरण दाद देत नसल्याने आता आंदोलन हाच पर्याय उरल्याने लवकरच तीनही वस्त्यांची तातडीची बैठक घेवून आंदोलनाची तारीख जाहिर करणार असल्याचे कापरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhamari villagers suffer due to lack of electricity and water