esakal | फुले वाड्याचा विकास येत्या काळात करुच; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

munde.

त्यांनी म्हटलं की, महाविकास आघाडी सरकारने सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

फुले वाड्याचा विकास येत्या काळात करुच; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे आज फुले वाड्यात आले होते, यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, महाविकास आघाडी सरकारने सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मी देखील सभागृहात ही मागणी केलेली होती. त्या शिक्षक दिनाची सुरुवात नायगाव या ठिकाणाहून होतीये. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री शिक्षक दिन साजरा करतायेत. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं मुंडे यांनी येवळी म्हटलं.

फुले वाड्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, फुले वाड्याचा विकास छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालाय. पुढच्या काळात तो आणखी व्हावा अशी अनुयायांची ईच्छा आहे. तो विकास पुढच्या काळात होईल, अशी मी खात्री देतो.

पुढे त्यांनी म्हटलं की, सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याचा आणखी विकास झाला पाहिजे तो येणाऱ्या काळात आम्ही नक्की करू. सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा महा विकास आघाडी सरकारने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री करत आहेत. मी फुले वाड्यामध्ये येऊन अभिवादन केलं आणि माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी निघालो आहे.

हेही वाचा - ...तर पुण्याचे नामांतर 'जिजापूर' करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून आज महाराष्ट्रभर साजरा करण्यात येत आहे. याबाबतची घोषणा महिला व बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली होती. यानिमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

loading image