

Leopard Spotted in Dhanori Munjabavasti on CCTV
Sakal
विश्रांतवाडी : सोमवारी पहाटे धानोरी येथील मुंजाबावस्ती परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. बिबट्या पहाटेच्या सुमारास धानोरी परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. याचा विडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. पण त्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष कुठेही बिबट्या दिसून आला नाही. परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. वनविभागाच्या वतीने शोधमोहीम सुरू आहे.