esakal | आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे अल्पावधीतच होणार आजाराचे निदान
sakal

बोलून बातमी शोधा

patil, kharat and pant.jpg

"डीपटेक' स्टार्टअप; रुग्णांना तात्काळ, कमी खर्चात अहवाल देणार 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे अल्पावधीतच होणार आजाराचे निदान

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : आजाराचं निदान करायचं असेल तर त्यासाठी काही चाचण्या आवश्‍यक असतात. त्यानंतर त्याचा अहवाल येण्यात एक ते दोन दिवसांचा कालावधी जातो. या काळात उपचारास विलंब झाल्याने रुग्णाची स्थिती बिघडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील ही अडचण लक्षात घेत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने एक्‍स-रे, सिटी स्कॅनद्वारे तात्काळ आणि कमी खर्चात सुमारे 25 आजारांचे निदान करण्यात यशस्वी झालो असल्याचे "डीपटेक' या स्टार्टअपचे सहसंस्थापक अजित पाटील सांगतात. 

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

"ऑटोनॉमस रेडिओलॉजी लॅब'मध्ये स्कॅन काढल्यानंतर मशीनच त्याचे रिपोर्ट तयार करते. तज्ज्ञांनी त्याची खात्री केल्यानंतरच ते रुग्णांना देण्यात येतात. "डीपटेक' हे पुणे स्थित स्टार्टअप असून सप्टेंबरमध्ये 2018 मध्ये डॉ. अमित खरात (रेडिओलॉजिस्ट), डॉ. अनिरुद्ध पंत (डेटा सायंटिस्ट) आणि अजित पाटील (आयआयटी) यांनी त्याची स्थापना केली. वैद्यकीय तपासणीच्या संदर्भात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 30 तज्ज्ञांची टीम त्यांच्याकडे कार्यरत आहे. हे स्टार्टअप सध्या शहरातील 50 रुग्णालयांना त्यांची सुविधा पुरवत आहे. याबाबत पाटील यांनी सांगितले की, टेस्टचा केवळ रिपोर्ट देणे गरजेचे नसून तो अचूक असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही सॉफ्टवेअरवर आधारित प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तांत्रिकदृष्ट्या तज्ञ लोक यांची सांगड घालून कमी वेळेत रिपोर्ट देतो. सध्या आम्ही प्रत्येक महिन्याला अशा प्रकारचे 20 हजार टेस्ट करत आहोत. त्यासाठी आकारले जाणारे शुल्कही कमी आहे. 

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत    

एक्‍स-रे व सिटी स्कॅनद्वारे कोरोना तपासणी 
एक्‍स-रे आणि सिटी स्कॅनद्वारे कोरोनाची तपासणी करण्याबाबत सध्या "डीपटेक' काम करत आहे. लक्षणे, इतर कुठले आजार आहेत का?, ऑक्‍सिजनची पातळी किती आहे? आणि एक्‍स-रे व सिटी स्कॅन या सर्वांचा विचार करून रुग्णाला कसे उपचार द्यायला हवेत, याबाबत डॉक्‍टरांना सांगितले जाते. या टेस्टद्वारे कोरोना आहे की नाही हे स्पष्ट होत नसले तरी आपल्याला अंदाज येत असतो की रुग्णाला कुठे आणि कशा पद्धतीने उपचार करता येईल, असे पाटील यांनी सांगितले. 

 Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

 

मशीनच सर्व रिपोर्ट अगदी शंभर टक्के योग्य पद्धतीने मांडेल. त्यासाठी तज्ञांची गरज लागणार नाही, असे तंत्रज्ञान अजून विकसित व्हायचे आहे. या पूर्वीची आमची काही उत्पादने ऑटोमॅटिक पद्धतीने चालत आहेत. रिपोर्टसाठी रेडिओलॉजिस्टची देखील गरज लागणार नाही, असे तंत्रज्ञान विकसित व्हायला आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. 
- अजित पाटील, सह सहसंस्थापक, 'डीपटेक' 


 

loading image
go to top