Ajanta Caves
Ajanta CavesSakal

अजिंठ्यातील लेण्यांचे डिजिटल पुनरुज्जीवन; पुण्यातील रवींद्र बोरावकेंचा उपक्रम

पुण्यातील एका अवलियाने केवळ खीन्नतेची भावना व्यक्त करून न थांबता, चक्क लेण्यांच्या डिजिटल पुनरुज्जीवनाचा प्रकल्प स्वयंप्रेरणेने हाती घेतला आहे.
Summary

पुण्यातील एका अवलियाने केवळ खीन्नतेची भावना व्यक्त करून न थांबता, चक्क लेण्यांच्या डिजिटल पुनरुज्जीवनाचा प्रकल्प स्वयंप्रेरणेने हाती घेतला आहे.

पुणे - वेरूळ-अजिंठ्यातील (Verul Ajintha) भग्न शिल्पे (Craft) आणि तुटलेल्या लेण्या (Caves) पाहिल्यावर आपल्या सर्वांचे मन विषण्ण होते. मात्र पुण्यातील एका अवलियाने केवळ खीन्नतेची भावना व्यक्त करून न थांबता, चक्क लेण्यांच्या डिजिटल पुनरुज्जीवनाचा प्रकल्प (Digital Revival Project) स्वयंप्रेरणेने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर रिसतर मुर्तीशास्राचे पदव्युत्तर शिक्षणही पुर्ण केले आहे.

खासगी कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाल्यावर बोरावके यांनी आपला छंद जोपासायचे ठरविले. ते सांगतात,‘‘वेरूळच्या या भग्न लेण्या पाहिल्यावर त्यांचे मुळ स्वरूप कसे असेल. याचे मला नेहमी कुतूहल होते. म्हणून मागील पाच वर्षांपासून वेरूळला गेल्यावर आठवडाभर मुक्काम करून लेणीतील छायाचित्रे काढायचे. त्यानंतर खरे काम सुरू व्हायचे. त्या शिल्पामागची कथा आणि शास्र समजून घेण्यासाठी तज्ज्ञांच्या भेटीगाठीची प्रक्रिया सुरू व्हायची. अनेक दिवसांच्या संशोधनानंतर चित्राला शास्रीय पद्धतीने डिजिटल रेखाटणाची प्रक्रिया पूर्ण व्हायची.’’ या सर्व प्रकल्पासाठी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.जी.बी.देगलूरकर यांची मदत लाभल्याचे बोरावके यांनी सांगितले.

Ajanta Caves
शैक्षणिक शुल्क न भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास शाळेकडून नकार

प्रकल्पाची व्याप्ती -

- वेरूळमध्ये आठव्या शतकातील ३२ लेण्या आहेत

- १६ व्या क्रमांकाच्या कैलास लेणीत गेली पाच वर्षांपासून काम

- बुद्धांना भेटायला येणारे इंद्र, रामायणाचा पट, कैलास तोरण, गंगावतरण, ब्रह्मा, शिव आदी मुर्तींचे डिजिटल पुनरुज्जीवन

- आजवर १०० शिल्पांवर काम केले आहे

- मुर्तींबरोबरच चित्रांचेही डिजीटल पुनरुज्जीवन

डिजिटल पुनरुज्जीवनाचा वैशिष्ट्ये -

- अस्पष्ट, तुटलेल्या मुर्त्यांचे पूर्ण स्वरूप समोर येते

- देवीदेवतांच्या हातातील शस्त्र, मुद्रा, आसने, चेहऱ्यावरील भावना, मुर्तीमागची कथा आणि नवे सिद्धांत समोर येतात

- डिजिटल पुनरुज्जीवित झालेल्या लेण्यांचा दीर्घकाळ अध्ययनासाठी फायदा होणार

वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांचे डिजिटल पुनरुज्जीवन मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. अनेकांनी या कार्यात स्वतःला जोडून घेतले. तर येणाऱ्या पिढीला हा समृद्ध सांस्कृतिक वारसा मुळ स्वरूपात अनुभवायला मिळेल.

- रवींद्र बोरावके, मुर्तीशास्राचे अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com