

Dilip Kamble car vandalism
esakal
Pune Crime: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते दिलीप कांबळे यांच्या दोन चारचाकी वाहनांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे ही घटना कांबळे यांच्या घराबाहेरच घडल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील सिटाडेल एम्प्रेस सोसायटीमध्ये ही घटना घडली.