डिंभे धरणक्षेत्रात यंदा कमी पाऊस; माणिकडोह, पिंपळगाव जोगा धरणं अजून निम्मीच

dimbhe dam.jpg
dimbhe dam.jpg

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यासह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळ्याला वरदान ठरणारे डिंभे धरण मंगळवारी 100 टक्के भरले. तरी धरणक्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच असल्याचे चित्र आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने डिंभे धरणातून 20 दिवसांत सव्वाअकरा तर यंदा फक्त पाच दिवसांत 1.10 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, असे डिंभे धरण विभागाचे तानाजी चिखले यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणपती विसर्जनापासून साधारण 22 दिवसांपासून आंबेगाव तालुक्‍यासह विविध तालुक्‍यात धो-धो पाऊस कोसळत आहे. हा पाऊस पूर्व पट्ट्यात असून धरण क्षेत्रात पाऊस नसल्याचे चित्र आहे. आंबेगाव तालुक्‍यात धरणाच्या खालील भागातच मुसळधार पाऊस पडत आहे. त्याच्या वरील धरण क्षेत्रातील भागात पाऊस पडत नाही. 


माणिकडोह, पिंपळगाव जोगा निम्मीच...
मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे कुकडी विभागातील एकूण सात धरणांपैकी डिंभे, वडज, येडगाव, चिल्हेवाडी, घोड ही पाच धरणे भरली असली तरी अजून जुन्नर तालुक्‍यातील महत्त्वाची असलेली माणिकडोह व पिंपळगाव जोगा ही दोन धरणे अजून निम्मी पण भरली नाहीत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कुकडी प्रकल्पात आजअखेर 73.83 टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी 92.33 टक्के होता. 


अशी आहे आकडेवारी 

  • डिंभे धरणातून 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या पाच दिवसांत घोडनदीत एक टीएमसी व उजव्या कालव्यात 0.10 टीएमसी पाणी सोडले 
  • मागील वर्षी घोडनदी पात्रात 20 दिवसांत तब्बल 10.44 टीएमसी, डावा व उजवा कालव्यात पाऊण टीएमसी विसर्ग 
  • त्यामुळे यंदा जवळपास 10 टीएमसी पाण्याची धरणात कमी आवक 
  •  मागील वर्षीच्या तुलनेत डिंभे धरणक्षेत्रात जवळपास निम्माच पाऊस पडल्याची आकडेवारी 
  •  मागील वर्षी एकूण पाऊस 1500 मिलिमीटर पडला होता 
  • यंदा 871 मिलिमीटर पावसाची नोंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com