

With Dimbhe Dam reaching 98% storage, authorities have increased water discharge into the Ghod River to 19,545 cusecs and issued an alert for 44 villages along the riverbank, urging residents to stay away from the river and low-lying areas.
Sakal
मंचर : हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ३) दुपारी दीड वाजल्यापासून धरणाच्या सांडवा व इतर माध्यमांतून एकूण २० हजार ९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.अशी माहिती डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.