
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. याविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच आता या प्रकरणात जबाबदार असलेले डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा सोपवला आहे. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेत रुग्णालयाची बाजू मांडली आहे.