esakal | सरळसेवा भरती एमपीएससीने भरावी की खासगी कंपनीने; विद्यार्थी संघटनांमध्येच लागला वाद
sakal

बोलून बातमी शोधा

direct service Recruitment conflict between student unions

- एमपीएससीने भरावी की खासगी कंपनीने यावरून मतभेद
- दोन्ही गटांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम

सरळसेवा भरती एमपीएससीने भरावी की खासगी कंपनीने; विद्यार्थी संघटनांमध्येच लागला वाद

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : राज्यातील सरळसेवेची भरती खासगी संस्थेमार्फत करावी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) यावरून सरकारकडून काहीच स्पष्ट होत नसले तरी विद्यार्थी संघटना मात्र एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या असून, यावर सोशल मीडियावर जोरदार वादावादी सुरू झाली आहे. मात्र, दीड वर्षांपूर्वी ज्यांनी अर्ज भरले ते मात्र आपले काय होणार ? या विचाराने संभ्रमात पडले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महायुती सरकारच्या काळात सरळ सेवा अतंर्गत राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर्ग दोन व तीनची पदे भरली जात होती. हे काम महापरीक्षा पोर्टलकडे होते. यावेळी राज्य भरातून सुमारे ३३ लाख अर्ज आले होते. पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने भरती वादात सापडली. महाविकासआघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्या ऐवजी 'महाआयटी'तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली आहे. मात्र, खासगी कंपनीने केलेल्या भरतीत पुन्हा भ्रष्टाचार होईल यामुळे वर्ग अ ते वर्ग ड पर्यंतची भरती 'एमपीएससी'द्वारेच करावी अशी मागणी केली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यानच्या काळात आयोगानेही भरती करण्याची तयारी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे, पण त्याला अजून मान्यता मिळालेली नाही. या मागणीसाठी एमपीएससी समन्वय समिती, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स यासह राज्यातील इतर संघटना समोर आल्या आहेत, त्यांनी राज्यातील आमदार व इतर नेत्यांना याबद्दल विचारणा करून दबाब वाढवला आहे. 

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार

याबाबत एमपीएससी समन्वय समितीचे प्रतिनिधी विश्वंभर भोपळे म्हणाले, "खासगी कंपनीने भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे 'एमपीएससी'ला सक्षम करून सर्व भरती त्याच माध्यमातून झाली पाहिजे. काही उमेदवाक भरतीमध्ये आखणी उशीर होईल म्हणून एमपीएससीकडे हे काम देण्यास विरोध करत आहेत. पण यापेक्षा पारदर्शकता आवश्यक आहे."

'एमपीएससी' असमर्थ 
वर्षभरात 'एमपीएससी' १० परीक्षा घेते, पण त्याचा ही दोन दोन वर्ष लागत नाही. मग लाखो अर्ज आलेल्या सरळसेवेची भरती करण्याची क्षमता आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सध्या खासगी कंपनीकडून भरती करून भरती संपवला पाहिजे.  ज्या संघटना एमपीएससीकडे भरती देण्याची मागणी करत आहेत ते सर्व क्लासवाल्यांच्या भल्यासाठी सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केला आहे. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार

"जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरून दीड वर्ष झाला आहे, पण अजून भरतीची काहीच प्रक्रिया नाही. नवीन खासगी कंपनी नियुक्त करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे अशी माहिती आहे, त्यामुळे यावर शासनाने लवकर निर्णय घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे. एमपीएससी की खासगी कंपनी यावरून संभ्रम निर्माण होत आहे, यावर सरकारने स्पष्टता आणावी. 
- प्रकाश पाटील, उमेदवार, सरळसेवा

loading image