धनगर बांधवांच्या घराण्यातील 'त्या' ऐतिहासिक तलवारीचा शोध

tal.jpg
tal.jpg
Updated on

पुणे : इतिहासाचा अभ्यास आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी शहर आणि परिसरातील ग्रामदेवतांचा अभ्यास करणारे पुण्यातील संशोधक प्रणव पाटील यांनी एका ऐतिहासिक तलवारीचा शोध लावला आहे. मुळशी तालुक्यामध्ये मोसे खोऱ्यातील तव गावातल्या गोरे नावाच्या धनगर घराण्यात त्यांना ही तलवार तसेच इतर काही वस्तू आढळून आल्या. तर या तलवारीवर काही ऐतिहासिक खुणा दिसून आल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत माहिती देताना प्रणव म्हणाले, "ग्रामदैवत व लोकदैवतांच्या अभ्यासादरम्यान मावळातील डोंगरांवर वसलेल्या अनेक धनगर पाड्यांवर भेट दिली. तेव्हा या गावातील गवळी धनगर घराण्याची माहिती मिळाली. या घराण्याचे वंशज राहुल गोरे यांच्याकडे शिक्का, कट्यार, तलवार, नाणी सारख्या काही पुरातन वस्तू आढळून आल्या. त्यापैकी एक अतिशय महत्वाचं इतिहासाचं अज्ञात पान उलगडणारी तलवार आढळून आली. जीच्यावर चंद्र, सूर्य, बेलपत्र आणि नंदी यांच्या बरोबरच या तलवारीच्या पात्यावर फारसी मध्ये एक लेख कोरलेला आढळला.

त्यावर 'शहाजी राजा भोसला के नूर- ए- जंग धनोजीराव ठिकडा' असे फारसीमध्ये लिहण्यात आले होते. त्याचा अर्थ म्हणजेच सदर घराण्याचा वीर पुरुष यांस नूर-ए जंग रावठिकडा अशी पदवी देण्यात आली होती. तर या घराण्यातील आणखी दोन वीर आहेत, ज्यांची नावे मुलाजी रावठिकडा गोरा, खंडोजी गोरा रावठिकडा अशी आहेत. या तलवारी शिवाय त्यांच्या देवघरात 'शिवराई' ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी देखील आढळली आहेत. तर या ऐतिहासिक तलवारीमुळे मावळतील अज्ञात शूर मावळ्यांच्या एका घराण्यावर प्रकाश पडण्यास मोठी मदत झाली आहे."

शहाजी महाराजांकडून मिळाली 'राव ठिकडा' पदवी :
गोरे घराणे मुळचे सातारा जिल्ह्यातील बामणोली गावचे रहिवासी आहेत. परंतु आदिलशाहीमध्ये सरदार असणारे हे घराणे शहाजी महाराजांच्या संपर्कात आले. त्यावेळी शहाजी महाराजांनी 'राव ठिकडा' ही पदवी दिली. त्याची नोंदही या तलवारीवर आहे. त्यामुळे या घराण्यातील लोक त्यांच्या आडनावामध्ये राव ठिकडा किंवा ठिकडे हे नाव लावतात. सध्या पुण्यात राहत असल्याने ही सर्व शस्त्रे अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवली आहेत. अशी माहिती राव ठिकडा गोरे घराण्याचे सध्याचे वंशज राहुल गोरे यांनी दिली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com