
तालुक्यात कोरोनोचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. या महामारीचा सामना आपले प्रशासन तसेच असंख्य आरोग्य कर्मचारी पोलिस व तालुक्यातील विविध संस्था पुढे येऊन उत्तम प्रकारे करत आहेत. हा संघर्ष सर्वांनाच करावा लागत आहे. अशा परिस्थितीत
शिवसेना- राष्ट्रवादीत वाद पेटला, शिवसेनेच्या उपोषण आंदोलनाला राष्ट्रवादीचे मौन व्रताने उत्तर
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात प्रशासनाला कोरोनो परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप करत उपोषणाला बसणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासमोर मौन व्रत धारण करून बसणार आहेत.
आंबेगाव तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात तत्काळ मिनी जंबो कोविड सेंटर उभारावे, या मागणीसाठी व प्रशासनास कोरोनो परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप करून शिवसेनेच्या वतीने बुधवारी तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यासंबंधी निवेदन शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य व माजी उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी तहसीलदार यांना दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे धामणीचे अध्यक्ष व सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सचिन जाधव यांनी तहसीलदार यांना निवेदन पाठवले आहे.
पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोचववला पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात
या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, तालुक्यात कोरोनोचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. या महामारीचा सामना आपले प्रशासन तसेच असंख्य आरोग्य कर्मचारी पोलिस व तालुक्यातील विविध संस्था पुढे येऊन उत्तम प्रकारे करत आहेत. हा संघर्ष सर्वांनाच करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यात प्रशासनाला करोना महामारीची स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा बालिश आरोप करत व्यवस्थेला जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्पादनशुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील तालुक्यातील कोरोनो परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून प्रशासनाच्या सहकार्याने आरोग्य सुविधा आणखीन प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील असताना व अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे असतानाही रवींद्र करंजखेले हे प्रशासनाला वेठीस धरून प्रसिद्धीसाठी समाजात तणाव निर्माण करू पाहत आहेत. त्यांच्या उपोषणाचा निषेध म्हणून तहसीलदार कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने मौन व्रत घेऊन बसणार आहे.
Web Title: Dispute Between Shiv Sena And Ncp Workers Ambegaon Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..