पुण्यात 12,500 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; मदत मिळणार?

farmer
farmer
Summary

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ते-पुलांसह घरांचीही पडझड झाली असून, त्यात सुमारे ६५ कोटींची हानी झाली आहे.

पुणे- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ते-पुलांसह घरांचीही पडझड झाली असून, त्यात सुमारे ६५ कोटींची हानी झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी बाधितांसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमधून जिल्ह्याला नुकसानभरपाईची ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांना अतिवृष्टीचा जादा फटका बसला आहे. (Pune marathi latest news)

भोर तालुक्यातील आंबवडे येथील मोहन अमृता घोरपडे या व्यक्तीचा विजेचा झटका बसून मृत्यू झाला. या मृताच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. भोर तालुक्यातील बालवडी येथील अंकुश सोमाजी उतेकर आणि मावळ तालुक्यातील शिरधे येथील बबन पांडुरंग कोकाटे या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. या मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांचे अर्थ साहाय्य मंजूर करण्यात आले आहे. तसेच, भोर तालुक्यातील कांजळे गावात एका तरुणाचा पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. परंतु या तरुणाने दारू पिऊन पाण्यात उडी घेतल्याचे कारण देत तहसीलदार यांनी मदतीस अपात्र ठरवले आहे.

farmer
मुंबई: लोकल सेवा सुरु करणार का? मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

शेतीपिकांचे नुकसान :

अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती आणि फळपिकांचे तीन हजार १८३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे दहा हजार शेतकऱ्यांचे दोन कोटी २० लाखांचे नुकसान झाले आहे. शेतजमीन खरडून गेल्यामुळे ७१७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याचा फटका अडीच हजार शेतकऱ्यांना बसला असून, दोन कोटी २९ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच, सात गायी, म्हशी, चार बकऱ्या आणि ७० कोंबड्या मृत झाल्या आहेत. त्यामुळे सव्वातीन लाखांचे नुकसान झाले आहे.

रस्ते-पुलांचे सर्वाधिक नुकसान

अतिवृष्टीमुळे सात राज्यमार्ग आणि १६ प्रमुख जिल्हा मार्ग बंद पडले होते. प्रमुख मार्गांवरील सहा पूल पाण्याखाली गेले होते. अतिवृष्टीमुळे रस्ते- पुलांचे ५४ कोटींचे नुकसान झाले आहे. शेतपिकांसोबतच महावितरण आणि शाळांच्या इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

farmer
पेगॅसस प्रकरण खरं असल्यास आरोप गंभीर- सुप्रीम कोर्ट

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण ४८४ घरांची पडझड झाली आहे. ९८ कुटुंबांमधील ४०२ व्यक्तींना स्थलांतरित करावे लागले. शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे ६५ कोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

पूर स्थितीमुळे हानी :

एकूण बाधित गावे ४२० (पूर्णत: १० गावे)

मृत व्यक्ती ३

मृत पशुधन ८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com