esakal | 'आम्ही जातो आमच्या गावा'; परप्रांतीय मजूर बसने गावाकडे निघाले!
sakal

बोलून बातमी शोधा

Other-State-Workers

कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी घेऊन मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले.

'आम्ही जातो आमच्या गावा'; परप्रांतीय मजूर बसने गावाकडे निघाले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या 24 मजुरांना जिल्हा प्रशासनाने बस उपलब्ध करून राजस्थानला त्यांच्या बाडमेर जिल्ह्यातील मूळ गावी पाठविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करत वैद्यकीय तपासणी केलेल्या या 24 मजुरांना आज दुपारी बसने राजस्थानकडे रवाना करण्यात आले. या वेळी तहसिलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी आणि पिरंगुट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. 

- पुणे : 'या' भागातील दारुची दुकाने राहणार बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

जिल्हा प्रशासनाने मजुरांसाठी निवारागृहे उभारली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अनेक मजुरांना निवारागृहांचा आधार मिळत आहे. लॉकडाऊनमधे काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने आपल्या हाताला इथे रोजगार मिळेल, त्यामुळे आपण इथे राहू शकता, अशी विनंती प्रशासनाने मजुरांना केली. मात्र, मजुरांनी आजपर्यंत केलेल्या व्यवस्थेबाबत प्रशासनाचे आभार मानत गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.

मजुरांच्या इच्छेवरून प्रशासनाने मजुरांची पिरंगुट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली. कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी घेऊन मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले. आज दुपारी ही बस मजुरांना घेवून राजस्थानकडे रवाना झाली. 

- पुणे : शहर एकच मग कोरोना रुग्णांची संख्या वेगळी कशी? स्मार्ट सिटीच्या नकाशातील आकडे...

वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही परतले

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे निवारागृहात वास्तव्यास असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील 38 मजुरांना त्यांच्या मूळ गावी बसने पाठविण्यात आले. शिरुर तालुक्यात एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. कोरेगाव-भीमा येथील एका महाविद्यालयात त्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची प्रक्रिया निश्चित करुन दिल्यानंतर वाशिम जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले. या सर्व व्यक्तींना सुखरुप त्यांच्या घरी पोचविण्यात आले.

- तुम्हाला माहित आहे का? पुण्यात दारु मिळविण्यासाठी मिळताहेत पैसै

मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. परराज्यात जाण्यासाठी इच्छुक कामगारांना वैद्यकीय तपासणी  आणि वाहनांची सुविधा उपलब्ध करून टप्प्याटप्प्याने त्यांच्या गावी पाठविण्यात येईल.
 - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा