esakal | जिल्हा बॅंकेला जुन्या नोटाही जपल्या जाताहेत काळजाच्या तुकड्यासारख्या
sakal

बोलून बातमी शोधा

Old Currency

जिल्हा बॅंकेला जुन्या नोटाही जपल्या जाताहेत काळजाच्या तुकड्यासारख्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र सरकारने (Central Government) नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा (Old Currency) भारतीय चलनातून बाद केल्या. हा निर्णय झाला अन या निर्णयापूर्वी प्रत्येकाचा जीव की प्राण असलेल्या या नोटांचा क्षणात कचरा झाला. जुन्या नोटा म्हणजे मूल्यहीन अशी या नोटांची अवस्था झाली. केंद्र सरकारने या नोटा बदलून देण्यासाठी काही कालावधी दिल्याने, दिलासाही मिळाला. पण याला अपवाद ठरली ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक (पीडीसीसी). या बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल तब्बल ५७६ कोटी रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा सुरवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. (District Bank Old Currency Security)

महत प्रयत्नांनंतर यापैकी ५५४ कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. तोपर्यंत बॅंकेचे ५० कोटींचे आर्थिक नुकसान झालेले. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या २२ कोटी २५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु कोरोनामुळे अंतिम निकाल बाकी राहिला आहे. यामुळं बॅंकेने या जुन्या नोटा चक्क लॉकरमध्ये ठेवून त्यांचा वाळवी व अन्य किडीपासून बचाव केला जात आहे. आज ना उद्या या नोटा बदलून मिळतील, या आशेने काळजाच्या तुकड्याप्रमाणे या जुन्या नोटांची जपणूक केली जात असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात सांगत होते.

हेही वाचा: आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल; बाबा आढाव

या नोटांच्या देखभालीसाठी बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत लागत आहे. चुक केंद्र सरकारची आणि शिक्षा मा६ जिल्हा बॅंकेला भोगावी लागत आहे. कारण या जुन्या नोटांमुळे बॅंकेला सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचे आर्थिक झळ सोसावी लागली आहे. परंतु बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने ही झळ सोसता आली. पण याचा ढोबळ नफ्यावर मोठा परिणाम झाल्याची भावनाही थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबरला सर्व बॅंकांना सुट्टी देण्यात आली. या सुट्टीमुळे ८ नोव्हेंबरला जमा झालेल्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बॅंकेचे अधिकारी १० नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये या नोटा जमा करण्यासाठी गेले. परंतु आमच्याकडे जुन्या नोटा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत या बॅंकांनी हे पैसे जमा करून घेतले नाहीत. तसे त्यांनी लेखी पत्र दिले आहे. या पत्राच्या आधारे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मात्र कोरोनामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी या निर्णयापर्यंत या जुन्या नोटा सुस्थितीत जपून ठेवण्याचे आव्हान जिल्हा बॅंकेसमोर आहे.

हेही वाचा: खडकवासला धरण साखळीत सुमारे २९.७३ टक्के पाणीसाठा

नोटा बदलून मिळण्यासाठीचे प्रमुख प्रयत्न

- रिझर्व्ह बॅंकेशी सातत्याने पत्रव्यवहार.

- नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅंकेचा स्पष्ट नकार

- तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्याशी अनेकवेळा चर्चा

- सर्वोच्च न्यायालयात आव्हान

- सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ पी. चिदंबरम यांनी बाजू मांडली

- मध्यंतरी चिदंबरम यांच्या अटकेनंतर कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली

- तुर्तास या नोटा चलनात ग्राह्य धरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

- आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे लक्ष

loading image