पुणे : संचालक आमदारांना जिल्हा बँकेच्या शुभेच्छा

पुणे : संचालक आमदारांना जिल्हा बँकेच्या शुभेच्छा

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असतानाच आमदार झालेल्या तीन संचालक आमदारांना बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत बँकेतर्फे विधिमंडळातील कामकाजाबाबत शुक्रवारी (ता.१५) शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हा बँकेचे संचालक असतानाच आमदार झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा खास सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस) हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. दुसरे संचालक दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) हे पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा खेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर गेले आहेत.

तिसरे संचालक आणि काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप हे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com