जिल्हा परिषद अर्थसंकल्प

जिल्हा परिषद अर्थसंकल्प
Published on

जिल्हा परिषद अर्थसंकल्प

बजेटमध्ये बांधकाम, शिक्षण विभागाला लॉटरी

सुधारित अंदाजपत्रक ४५ वरून ५५.७८ कोटींवर; १०.७५ कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २०२५-२६ वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. मूळ अंदाजपत्रक ४५.०३ कोटी रुपयांचे होते. त्यात १० कोटी ७५ लाखांची भर पडून ते ५५ कोटी ७८ लाखांवर पोचले आहे. १६ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ५५ कोटी ७८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, यामध्ये बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकात ४.६८ कोटींची तर शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात ४.८० कोटींची वाढ करण्यात आल्याने या दोन्ही विभागांना लॉटरी लागली आहे.
समाजकल्याण विभागास ४.६१ कोटी रुपयांची तरतूद होती. सुधारित अंदाजपत्रकात १.४१ कोटींची वाढ करत ६.०२ कोटींच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. लघुपाटबंधारे विभागास २ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यात ५० लाखांची कपात करून सुधारित अंदाजपत्रकात १.५० कोटींची तरतूद केली आहे. पशुसंवर्धन विभागास ३.२० कोटी, कृषी विभागास ३.९९ कोटी, पाणीपुरवठा विभागास २.९६ कोटी, महिला व बालकल्याण विभागास ३.३६ कोटींची तरतूद केली आहे. मूळ अंदाजपत्रकात शिक्षण विभागास ५.२० कोटींची तरतूद होती. सुधारित अंदाजपत्रकात ४.८० कोटींची वाढ करत १०.०१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागास ५.१० कोटी, अर्थ विभागास १.५४ कोटी, तर सामान्य प्रशासन विभागास ५५ लाखांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.

बांधकाम विभागास १३.६८ कोटी...
२०२५-२६ च्या मूळ अंदाजपत्रकात बांधकाम विभागास ९ कोटींची तरतूद होती. सुधारित अंदाजपत्रकात ४.६८ कोटींची वाढ होऊन ती १३.६८ कोटींवर पोचली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती इमारतींचे विस्तारीकरण, देखभाल-दुरुस्तीसाठी ८० लाखांवरून १.११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इमारत बांधकाम, फर्निचर, देखभाल-दुरुस्तीसाठी मूळ अंदाजपत्रकात १.५० कोटींची तरतूद होती. सुधारित अंदाजपत्रकात ती वाढवून २.७४ कोटी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व ग्रामीण रस्ते कामांसाठी मूळ अंदाजपत्रकात २.६० कोटींची तरतूद होती. त्यात ४.४० कोटींची वाढ करत ६.०५ कोटींच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. विश्रामगृह विस्तारीकरण व दुरुस्तीसाठी ९४.७४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जि.प. मुख्यालय व यशवंतनगर येथील सफाईवर ३२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com