पुणे - देशात यंदा साखर उत्पादन वाढण्याची शक्यता लक्षात घेता साखरेच्या किमान विक्री दर स्थिर राहण्यासाठी केंद्राने साखर निर्यातीच्या कोट्यात आणखी वाढ करावी. त्याचबरोबर आणखी पाच लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.