आळंदी माऊलींची समाधी सजली तिरंगी

विलास काटे
Sunday, 16 August 2020

लॉकडाऊनमुळे माऊलींचे मंदिर सध्या दर्शनासाठी बंद आहे. यामुळे माऊलींचा समाधी मंदिर गाभाऱ्यात रोज फुलांची आरास केली जाते. विविध आकर्षक फुलांनी सजविलेले माऊलींची संजिवन समाधी आणि समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून सजविलेले रूप अनेकांचे मन आकर्षून घेते.

आळंदी(पुणे): श्रावण वद्य एकादशी आणि स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात तुळशी मंजिऱ्यांच्या माळा, गुलाब पुष्प झेंडूची फुलांचा वापर करून माऊलींची संजिवन समाधी तिरंगी रंगात सजविण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

लॉकडाऊनमुळे माऊलींचे मंदिर सध्या दर्शनासाठी बंद आहे. यामुळे माऊलींचा समाधी मंदिर गाभाऱ्यात रोज फुलांची आरास केली जाते. विविध आकर्षक फुलांनी सजविलेले माऊलींची संजिवन समाधी आणि समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून सजविलेले रूप अनेकांचे मन आकर्षून घेते. देवस्थान, कर्मचारी, पुजारी, मानकरी सोशल मिडियावरून माउलींच्या समाधीची आरस, आरती, पवमान पुजा रोजच्या रोज शेअर करत असल्याने भाविकांना घर बसल्या माऊलींच्या समाधी दर्शनाचा लाभ होतो. दरम्यान शनिवारी (ता.१५) स्वातंत्रदिन असल्याने माउलींच्या समाधीस तिरंगी रंगाची आरास केली होती. झेंडूची फुले आणि तुळशीच्या मंजिऱ्यांचा वापर विशेष केला होता. फुलांची आरास देवस्थानचे निवृत्त व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी यांचा मुलगा मुकुंद कुलकर्णी यांनी केली.

बापरे! आंबेगाव तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे कोरोनाग्रस्त!

मुकूंद कुलकर्णी इतर वेळी आळंदी देवदर्शनासाठी येणा-या शालेय सहलीच्या विद्यार्थ्यांना गाईडचे काम करत आहेत. दरम्यान समाधी सजविण्यासाठी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, योगेश आरू, बाळासाहेब कुऱ्हाडे, नितिन लोंढे, संतोष गावडे, निलेश वीर, संतोष वीर, अभिनव खंबात, गुलटेकडी येथील फुल विक्रेते यांनी फुलांसाठी सहकार्य केले.

मुळशी धरणातून उद्या होणार विसर्ग; मुळा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Mauli Mausoleum is decorated with Tricolor in alandi on 15 the august