Lockdown : घरच्या घरी करा वैज्ञानिक प्रयोग

Do scientific experiments at home during lockdown with help of Marathi Science Council
Do scientific experiments at home during lockdown with help of Marathi Science Council
Updated on

पुणे : धातूला चव असते का? गव्हाचे तृणांकूर कसे करायचे? एका तलावात किती थेंब असतात?... यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला घराच्या घरी मिळाली, तर... हो अगदी लॉकडाऊनच्या काळातही!

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाने त्यासाठी 'घरोघरी प्रयोगशाळा' हा उपक्रम सुरू केला आहे. यात विविध प्रश्न विचारून त्याची उत्तरे कशी मिळवायची, त्यासाठी प्रयोग करून निष्कर्षापर्यंत कसे पोचायचे, याची पद्धती देखील सांगितली जाते. दैनंदिन जीवनातील अनेक कूटप्रश्नांची उत्तरे प्रयोग करून शास्रीय पद्धतीने आपल्याला मिळविता येतात.

- ...आणि तेलतुंबडे प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागली ही भूमिका
प्रयोग, त्यासाठी लागणारे साहित्य, त्याची कृती आणि निष्कर्षासाठी काही तक्तेदेखील परिषदेमार्फत पाठविले जातात. घरातील प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांना एकत्र प्रयोग करून उत्तरे मिळवायची, अशी ही पद्धत आहे. अनेकजण या उपक्रमासाठी परिषदेकडे प्रयोगही पाठवत आहेत. तसेच प्रयोग करणाऱ्या कुटुंबांची निरीक्षणेही परिषदेकडे येत आहे, ते प्रकाशित करण्याचाही मानस परिषदेने व्यक्त केला आहे.

- मोठी बातमी : दीड लाख ऊसतोड कामगार मूळगावी परतणार; राज्य सरकारची परवानगी!
मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात बंदिस्त आहेत. त्यामुळे विज्ञानाशी गट्टी जमविण्याची ही संधीच घरोघर उपलब्ध झाली आहे. म्हणूनच परिषदेने घरोघरी प्रयोगशाळा हा उपक्रम सुरू केला आहे. परिषदेशी संबंधित नागरिकांना दररोज हे प्रयोग व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून लिखित स्वरुपात पाठविले जातात. त्याआधारे लोक प्रयोग करतात."

- Coronavirus : सर्व्हेसाठी आलेल्या टीमवर हल्ला; इंदूरमधील दुसरी घटना
विज्ञानाचे महत्त्व रुजावे, घरोघर त्याची गोडी लागावी. तसेच मुलांना लहान वयापासून प्रयोग वैज्ञानिक प्रयोग करण्याची सवय लागावी, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
- राजेंद्रकुमार सराफ (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद)

संपर्क : राजेन्द्रकुमार वि. सराफ, अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग 9822186763. ई मेल : mvipa.pune@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com